- सुनिता भाईप / सावंतवाडी-
बांदा येथिल श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थानात लोककल्याणासाठी तसेच रयतेच्या सुख समृध्दीसाठी पंचायतन शुद्धीकरण विधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. https://sindhudurgsamachar.in/kokan-सोल्जरॅथॉन-मॅरेथॉनमधून/
सोमवार दि.18 व मंगळवार दि.19 डिसेंबर असे दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी सकाळपासून विविध धार्मिक विधींना आरंभ झाला.यामध्ये प्रायश्चित विधी, प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्याहवाचन, नांदीश्राध्द, संभारदान, प्राकारशुद्धी, श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र, श्री देवी भुमिका चरणी महापूजा, पंचायतन देवतांना अभिषेक, पूजा, देवता स्थापन, नवचंडी जप आदी होऊन दुपारी आरती व तिर्थप्रसाद वाटप करण्यात आले.
मंगळवारी सकाळी आवाहित देवता पूजन, चंडीहोम, दुर्गाहोम, पंचायतन योग, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक आदी विधी होऊन दुपार नेवैद्य, महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम झाला. भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहऴ्याचा लाभ घेतला.