वेंगुर्ला /प्रतिनिधी- सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार आणि स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा निमित्त वेंगुर्ला नगरपरिषद आणि हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
यात कर्मचा-यांचे आरोग्य, रक्ताच्या विविध चाचण्या आणि आरोग्य विषयक इतर तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधेही देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि आयुष्यमान भारत कार्ड यांसारख्या योजनांचा लाभ देण्यात आला. याशिवाय इतर शासकीय योजनांची माहिती देखील कर्मचा-यांना देण्यात आली. त्यानंतर कमर्चा-यांना सुरक्षा उपकरणे आणि ओळखपत्रे वाटप करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्वच्छ-भारत-अभियान-अंतर/
फोटोओळी – नगरपरिषदेतर्फे स्वच्छता कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.