Kokan: सागरी महामार्ग रेवस-करंजा पूलाला मंजूरी स्वागतार्ह.! पण उर्वरित ६ पूलांच्या मंजुरीसाठी सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे तातडीने प्रयत्नशील रहावे – मोहन केळुसकर

0
53

कणकवली – भाई चव्हाण दि. ४- पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई महानगरीशी जोगणार्या रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा बंदराला जोडणार्या सागरी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र या महामार्गावरील उर्वरित ६ पुलांच्या मंजुरीसाठी सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे तातडीने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokhapur-पश्चिम-महाराष्ट्राला-क/

कोविआने स्थापनेपासूनच कोकण रेल्वेसह मुंबई -कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी महामार्ग हे प्रकल्प होण्यासाठी सातत्याने संघर्ष सुरू ठेवला आहे. सागरी महामार्गासाठी १९८० मध्ये आरोंदा-किरनपाणी, जैतापूर आदी ठिकाणी परिषदा घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर गेल्या ४२ वर्षांत या महामार्गाचे भिजत घोंगडे पडले आहे. त्याला कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूत आहे, असा आरोप करून केळुसकर म्हणाले, यापुर्वीच्या राज्य कर्त्यानी हा सागरी महामार्ग समृद्धी महामार्ग म्हणून जाहीर केला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. निधीही जाहीर केला आहे. मात्र असे असतांना या महामार्गावरील केवळ रेवस-करंजा या पुलासाठीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ८९८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र या महामार्गावरील दिघी, आगरदांडा, बाणकोट, बागमांडले, जयगड आणि दाभोळ या उर्वरित ६ पुलांच्या बाबतीत रस्ते विकास महामंडळाने कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येते नाही. हे सर्वं पूल नाबार्डकडे प्रस्तावित आहेत. वेशवी-बाणकोट-बागमांडया पूलाला तर २०१३ मध्ये नाबार्डकडून अर्थसाहाय्य मिळून देखील तो रखडला आहे. त्याला सर्वस्वी कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता जबाबदार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सागर-तीर्थ-किनाऱ्यावरी/

एकीकडे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या विद्यमान कार्यकाळात महाराष्ट्रासह देशातील अनेक महामार्ग, समृद्धी महामार्गांची कामे अल्पावधीतच पुर्ण झाल्याचे दिसते. मात्र पत्रकारांनी मुंबई-कोकण-गोवा महामार्गासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरी या महामार्गाचे काम अनेक वर्षें रखडत चालले आहे, असे स्पष्ट करून ते म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यातील लोकप्रतिनिधी विकास कामांसाठी पक्षिय मतभेद विसरून एकत्रितपणे लढा देतात. मात्र कोकणवासियांच्या दुर्दैवाने कोकणातील लोकप्रतिनिधी पक्षिय झालर लावून विकास कामांच्या बाबतीत संघटितपणे प्रयत्न करत नाही. त्यामुळे पाटबंधार्यांसह विविध विकास कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. सागरी महामार्ग हा अंतर कमी करणारा आहे. पर्यटन विकासाला चालना देणारा आहे. महत्वाचे म्हणजे देशाच्या संरक्षणध्ष्टया अती महत्वाचा आहे. त्यामुळे आता तरी या सर्वं पक्षिय लोकप्रतिनिधींनी हा महामार्ग सर्वं पुलांनिशी तातडीने पुर्णत्वास नेण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे एकत्रितपणे पाठपुरावा करायलाच हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here