वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘मानव साधन विकास संस्था‘ ही कोकणातील एक नामांकित सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ‘सिंधुपुत्र‘ उपक्रमा अंतर्गत मासेमारी या पारंपारिक व्यवसायास पुरक म्हणून आर्थिक वृद्धीसाठी २०० मच्छिमार युवक युवतींना वॉटर स्पोर्टस कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-शहर-राष्ट्रवा/
सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ८७ मच्छिमार सिधुपुत्रांना गोवा येथे वॉटर स्पोर्टसचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन केंद्रीय संस्थेमार्फत अधिकृत परवाना देण्याचा स्तुत्य कार्यक्रम आरवली-सागरतीर्थ येथील ‘आराकिला‘ या पंचतारांकित रिसॉर्टवर संपन्न झाला. यावेळी बोलताना सौ.प्रभू म्हणाल्या की, गेल्या २५ वर्षांत मानव साधन विकास संस्थेने, देशातील पहिली ‘ग्रामीण जनशिक्षण‘ संस्था जन शिक्षण संस्थान-सिंधुदूर्ग, नवी मुंबईतील वंचित कामगारांच्या पाल्यांकरीता ‘उद्योजकता विकास संस्था‘, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘नर्सिंग स्कूल‘, ‘परिवर्तन केंद्र-प्रकल्प‘, इत्यादींच्या माध्यमातून सिंधुदूर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांतील ९० हजारहून जास्त गरजूंना उपजिविकाक्षम प्रशिक्षण देवून उद्योग व रोजगारक्षम बनविले आहे.
मानव साधन विकास संस्था संचलित ‘परिवर्तन केंद्र‘ संकल्पनेच्या माध्यमातून सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू महिलांना २६०० शिवणयंत्रांचे वाटप, खेड्यांतील माध्यमिक शालेय विद्यार्थिनींसाठी २००० ‘सायकल बँक‘, ‘मिशन व्हिजन‘ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी व चष्मे वाटप अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचा फायदा आतापर्यत लाखो लाभार्थ्यांना मिळाला आहे. कोकणातील सामाजिक व आर्थिक शाश्वत विकास हेच मानव साधन विकास संस्थेचे ध्येय आहे असल्याचे सांगितले.
फोटओळी – वॉटर स्पोर्टसच्या परवाना वितरण प्रसंगी उमा प्रभू यांनी मार्गदर्शन केले.