
सावंतवाडी ता.०५-:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही राष्ट्रवादीलाच मिळावी यासाठी आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत, आता वेळ फारच थोडा राहिला आहे, तरीही ही उमेदवारी राष्ट्रवादीलाच मिळेल,याचा आम्हाला विश्वास आहे असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-आकाश-फिश-मिल-बंद-करणार-ख/
दरम्यान स्थानिक आमदार केसरकर हे केवळ ताज हॉटेल उभा करण्याची घोषणा करत आहेत, मात्र त्यांची गोष्ट ही मी वीस वर्षांपूर्वी ऐकत आलो आहे मात्र ते कधी पूर्ण करणार हे मात्र त्यांनाच माहिती मात्र निवडणुका आल्या की लोकांना फक्त भुलभुलैय्या करायचं आणि निवडणूक जिंकायचं हा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे मात्र आता मतदार त्यांच्या या भूलथापांना बळी पडणार नाहीत. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान लोकसभेला झालेल्या पैशांचा पाऊस तो आता पुन्हा एकदा विधानसभेला होणार आहे. त्यामुळे जनतेने या गोष्टीपासून वेळेत सावध राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना त्यांनी केले.