Kokan: सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुलाची दयनिय अवस्था

0
18
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल,
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुलाची दयनिय अवस्था

क्रीडा संकुलाच्या इमारतीचीही दयनीय अवस्था झाली आहे.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी –

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था अतिशय दयनिय झालेली असून प्रशासनाचे मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-डोंगरपाल-सिद्धेश्वर-भंड/

सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलॅटिक असोसिएशनतर्फे ११ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय अॅथलॅटिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील स्पर्धक, त्यांचे पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु, जिल्हा क्रीडा संकुल येथे चेंजिगरूम, स्वच्छता गृहे नसल्याने सर्वांचे अतोनात हाल झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत दखल घेऊन जिल्हा क्रीडा संकुल येथे योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित प्रशासनाला आदेश द्यावेत. जेणेकरून जिल्ह्यातील स्पर्धकांना त्याचा फायदा होईल असे अॅड.सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे.

  

फोटोओळी –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here