🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / सिंधुदुर्ग-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ येतात. या निवडणुकीसाठी माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात ०४ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २६८- कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार- (०६) २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण ०७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 270- सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण ०६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी एकाही उमदेवाराने माघार घेतली नसल्याने एकूण ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.