Kokan: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कु. दिक्षा प्रमोद नाईक हिचे कुडाळ रेल्वे स्टेशन येथे चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले स्वागत.

0
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कु. दिक्षा प्रमोद नाईक हिचे कुडाळ रेल्वे स्टेशन येथे चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले स्वागत.

.🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ l प्रतिनिधी:-

मराठी नृत्य इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणारी तसेच मराठी, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या ‘ सुंदरी ‘ या सेलिब्रिटी कलाकारांच्या शोमध्ये निवड झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कु. दिक्षा प्रमोद नाईक शुक्रवारी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कुडाळमध्ये आली.यावेळी चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने तिचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.तर पत्रकार आबा खवणेकर यांनी दिक्षाला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.तसेच हुमरमळा ग्रामपंचायतींच्या माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांनीही दिक्षाचे भव्य स्वागत केले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-सीईटी-परीक्ष/

दिक्षाचे पहिले पाऊल शुक्रवारी कुडाळ रेल्वे स्थानकावर पडताच चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या सर्व टीमने ढोल ताशांच्या नृत्याचा ठेका धरत दिक्षाचे स्वागत केले.यानंतर उपस्थित सर्व महिलांनी औक्षण करत तिला शुभेच्छा दिल्या. यानंतर चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे खजिनदार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिल भोगटे यांनी जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कु. दिक्षा प्रमोद नाईक हिचे शाल व श्रीफळ देऊन तिला सन्मानित केले.तर कुडाळवासियांनी दिलेले प्रेम केलेले स्वागत पाहून दिक्षा चांगलीच भावूक झाली. तर लेकीचे यश पाहून दिक्षाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.

सुप्रसिद्ध कोरियोग्रागर आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याचं माझे स्वप्न असून ते आज पूर्ण झाले असल्याचे दीक्षा नाईक हिने यावेळी सांगितले. तसेच आपल्या यशाचे सर्व श्रेय तिने चिमणी पाखरं डान्स अकॅडमी आणि अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर सरांना दिले.

तर चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी दिक्षाला संधी दिल्याबद्दल कोरियोग्राफर आशिष पाटील यांचे जील्हावसियांच्या वतीने आभार मानले. तसेच दीक्षाच्या आई – वडिलांचे देखील कौतुक केले.तसेच दिक्षाने घेतलेल्या उत्तुंग अशा गगनभरारीमुळे कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here