शिवसेना नेते,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत तसेच राज्याचे शालेय शिक्षण,मराठी राष्ट्रभाषा मंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष मा.ना.श्री.दीपकभाई केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० दशावतार मंडळांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून साहित्य तसेच वाहन खरेदीसाठी अनुदान मंजूर केले आहे.
शिवसेना नेते,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत तसेच राज्याचे शालेय शिक्षण,मराठी राष्ट्रभाषा मंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष मा.ना.श्री.दीपकभाई केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० दशावतार मंडळांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून साहित्य तसेच वाहन खरेदीसाठी अनुदान मंजूर केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-बाल-विकास-प्रकल्प-अधिकार/
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्याकडे दशावतार मंडळाचे अध्यक्ष श्री.देवेंद्र नाईक यांनी दशावतार मंडळांसाठी साहित्य व वाहन खरेदीसाठी अनुदान मिळण्यासंदर्भात मागणी केली. शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी तातडीने या मागणीचे पत्र शिवसेना नेते,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याजवळ केली. श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी राज्याचे शालेय शिक्षण,मराठी राष्ट्रभाषा मंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष मा.ना.श्री.दीपकभाई केसरकर यांच्याजवळ याबाबतच्या मागणीचे पत्र दिले.
दीपकभाई यांनी जिल्हा प्रशासनाला ही मागणी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.जिल्हा प्रशासनाने याबाबतची अंमलबजावणी करून तात्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरी देखील मिळाली.या कार्यपद्धतीवर खुश होऊन दशावतार मंडळाचे अध्यक्ष श्री.देवेंद्र नाईक यांनी शिवसेना नेते,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत तसेच राज्याचे शालेय शिक्षण,मराठी राष्ट्रभाषा मंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष मा.ना.श्री.दीपकभाई केसरकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांचे आभार व्यक्त केले.