Kokan: सिंधुदुर्गात पर्यंटन पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी

2
15
सिंधुदुर्गात पर्यंटन पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी

सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले पाणबुडी प्रकल्पाचाही समावेश

केंद्र सरकारने देशातील विविध राज्यातील ४० पर्यटन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.त्यामध्ये सिंधुदुर्ग येथील एक्स आय एन एस गुलदार अंडर वॉटर मुझीम ,कृत्रिम रीफ अँड कोरल पाणबुडी पर्यटन यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४६.९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिकमध्येही पर्यटनाच्या वाढीसाठी रामकाल पथाचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ९१.१४ कोटी रुपये मजूर केले असून या प्रकल्पामुळे ही पर्यटन केंद्रे जागतिक दर्जापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

केंद्र सरकारच्या पर्यटन विकास निधी प्रकल्पात सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले पाणबुडी प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यासाठी सरकारनं सुमारे ४७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. समुद्राखालचं जग बघण्याची उत्स्कुता पर्यटकांना असते. मात्र, सर्वांनाच स्कूबा डायव्हिंग करुन समुद्र तळ बघता येत नाही, याचाच विचार करुन हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प, सिंधुदुर्गात आणण्याचा विचार करण्यात आला. प्रगत देशांमधल्या प्रकल्पांचा बारकाईनं अभ्यास करुन हे पाणबुडी केंद्र निर्माण केलं जाणार आहे. यासाठी नौदलाच्या वापरात नसलेल्या युद्धनौकेचा उपयोग केला जाईल. या युद्धनौकेवर पाण्याखालचं एक संग्रहालयही बनवलं जाणार आहे. या बोटीवर कृत्रिम प्रवाळं विकसित केली जातील, ज्याकडे मासे आणि इतर समुद्री जीव आकर्षित होतील आणि पर्यटकांना समुद्रतळाचं अंतरंग बघता येईल.