Kokan: सिधुरत्नाचा फायदा घेऊन महिलांनी आर्थिक सक्षम व्हा!- दिपक केसरकर

0
85
सिधुरत्नाचा फायदा घेऊन महिलांनी आर्थिक सक्षम व्हा!-दिपक केसरकर
सिधुरत्नाचा फायदा घेऊन महिलांनी आर्थिक सक्षम व्हा!-दिपक केसरकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नत्ती   होऊन महिला सक्षमिकरणासाठी सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी यांत्रिकीकरण, पशुपालन, कुक्कुटपालन, पर्यटन अशा प्रकारच्या विविध व्यवसायांसाठी अर्थसहाय्यक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी वैयक्तिक किवा महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-पालकरवाडी-उपसरपंच-यशवंत/

सिंधुरत्न समृद्धी योजना अंतर्गत महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा व नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामधील कॅन्टीनचे  उद्घाटन सोहळा २३ डिसेंबर मंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, तहसिलदार ओंकार ओतारी, सिधुरत्न समृद्धी योजनेचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.आनंद तेंडुलकर, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे क्षेत्रिय अधिकारी योगेश वालावलकर, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, उमेश येरम यांच्यासह  शहरातील विविध बचत गटातील महिला, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भव्य महिला मेळावा आयोजित करून प्रत्यक्ष लाभार्थ्यांसोबत सुसंवाद साधणार असल्याचेही श्री.केसरकर यांनी सांगितले. डॉ.आनंद तेंडुलकर व योगेश वालावलकर यांनी योजनेबाबत विस्तृतपणे माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. सिधुरत्न योजनेची जनजागृती करण्यासाठी आणि या योजनेबाबत महिलांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये नियमितपणे एक खिडकी कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी कंकाळ यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार काका सावंत यांनी मानले.

फोटोओळी – सिंधुरत्न समृद्धी योजना अंतर्गत महिला बचत गटाच्या मार्गदर्शन मेळाव्यात बचत गटाच्या महिलांनी मंत्री केसरकर यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here