Kokan: सोन्सुरे येथील चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल – वेंगुर्ले पोलिसांची कारवाई

0
71
सोन्सुरे येथील चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल : वेंगुर्ले पोलिसांची कारवाई मारहाणीत गंभीर जखमी नारायण कावळे याचा मृ

मारहाणीत गंभीर जखमी नारायण कावळे याचा मृत्यू

वेंगुर्ले : प्रतिनिधी

आरवली – सोन्सुरे येथे दोन दिवसांपूर्वी अंगणात गाडी लावल्याच्या रागातून वाद होऊन मारामारी झाली होती. या मारहाणी मध्ये गंभीर जखमी झालेल्या नारायण महादेव कावळे (वय ५०) यांचा आज पहाटे गोवा बांबुळी येथ उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी त्यांचा मुलगा वैभव याने दिलेल्या तक्रारीनुसार सख्या काकासह पुतणा व दोन महिला असे मिळून चौघांवर वेंगुर्ले पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली आहे, अशी माहिती वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांनी दिली.  https://sindhudurgsamachar.in/kokan-नाताळनिमित्त-सजावटीचे-स/

याबाबत अधिक माहिती अशी की, अंगणात गाडी लावल्याच्या रागातून नारायण कावळे व त्यांचा मुलगा वैभव यांना त्याच्या काका-काकी व पुतण्याकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. हा गुन्हा १७ तारखेला सोन्सुरे येथे घडला होता. यात श्री. कावळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. दरम्यान बेदम मारहाण झाल्याने त्यांच्या आतडे व गुप्तांगाला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज वैद्यकिय अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी कृष्णा नारायण कावळे वय ६७, कांचन कृष्णा कावळे वय ५९, सुहास सुमंत कावळे वय ४५ आणि समीक्षा सुवास कावळे वय ४० या  चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

यातील दोन्ही गटाचा जमिन जागेच्या कारणावरुन गेली अनेक वर्षे वाद होता. यातून त्यांच्यात नेहमी खटके उडत असत. परंतु १७ तारखेला अंगणात गाडी लावल्याच्या रागातून त्यांचा मुलगा वैभव याला गाडीत रोखून मारहाण करण्यात आली. त्याने आरडाओरड केल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी वडील नारायण धावले. यावेळी त्यांनाही हाताच्या ठोश्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर चौघांवर खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज सायंकाळी उशिरा नारायण यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस अधिक तपास करत आहेत.

फोटो नारायण कावळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here