Kokan: सोल्जरॅथॉन मॅरेथॉनमधून जवानांच्या कुटुंबियांना सॅल्यूट 

0
76
सोल्जरॅथॉन,मॅरेथॉन,
सोल्जरॅथॉन मॅरेथॉनमधून जवानांच्या कुटुंबियांना सॅल्यूट

वेंगुर्ला प्रतिनिधी– गेल इंडिया प्रा.लि.आणि फिस्टिस्तानतर्फे भारतभर भारतीय सैन्य दलाचा विजय दिन साजरा करण्यात आला. १७ डिसेंबर रोजी घेतलेल्या सोल्जरॅथॉन मॅरेथॉन स्पर्धेत ५० जणांनी सहभाग घेऊन शहिद झालेल्या व जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सॅल्यूट करण्यात आला. तर वेंगुर्लावासीयांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबियांना मदत केली.https://sindhudurgsamachar.in/kokan-मानधनासाठी-कलाकारांच्य/

 या स्पर्धेसाठी फिटीस्तानने नेमलेल्या कॅप्टन प्रदिप वेंगुर्लेकर, अँबेसीडर संतोष पेडणेकर, मार्गदर्शन डॉ.प्रल्हाद मणचेकर यांचा पदक देऊन कंपनीतर्फे विशेष सत्कार तर प्रमुख पाहुणे सिधुदुर्गातील अल्ट्रा रनर व मार्गदर्शक डॉ.प्रशांत मडव, भारतातील ख्यातनाम अल्ट्रा रनर ओंकार पराडकर यांचा पदक आणि माजी लष्करप्रमुख वि.के.सिग यांच्या स्वाक्षरीतील प्रमाणपत्र देऊन तसेच सातत्याने स्वतः चालत फिरून समाजाला संदेश देणारे अशोक ठोंबरे यांचा मानपत्र देऊन सत्का करण्यात आला. मानपत्राचे वाचन डॉ.नामदेव मोरे यांनी केले. याप्रसंगी व्ही.एफ.एफचे मोहन होडावडेकर, कविता भाटीया यांच्यासह रनर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अमेय खानोलकर, डॉ.आर.एम.परब, प्रा.अरविद बिराजदार, लाडू जाधव, डॉ. अश्विनी माईणकर, प्रा.प्रदिप प्रभू, प्रा.पाटोळे आणि वेंगुर्ला फिटनेस फायटरच्या सभासदांनी मेहनत घेतली.

फोटोओळी –  मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here