आ. वैभव नाईक यांनी नगरपरिषदेत भेट देत दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
मालवण- मालवण शहरात स्वच्छता राखण्यासाठी व इतर कामांसाठी मालवण नगर परिषदेने स्वतःचा जेसीबी घेतला असून जेसीबी असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नगरपरिषद ठरली आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेच्या सभागृहाचे देखील नूतनीकरण करण्यात आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण नगरपरिषदेत भेट देऊन मुख्याधिकारी संतोष जिरगे व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पुढील वर्षभर नगरपरिषदेच्या निवडणुका होणार नाहीत त्यामुळे प्रशासनाने मालवण शहरातील कामे चांगल्या पद्धतीने करून घ्यावीत.बीच क्लिंनिग मशीन देखील आपल्याकडे आहे. न.प.चे सभागृह देखील चांगले झाले आहे. येत्या काळात मालवणचे भाजी मार्केट, फिश एक्वेरियम ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-मदन-हजेरी-भूषविणार-बालकु/
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,मंदार ओरोसकर, बाबी जोगी, महेश जावकर, किरण वाळके, सेजल परब, संमेश परब दीपा शिंदे, तपस्वी मयेकर, गणेश कुडाळकर, निनाक्षी शिंदे यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नगरपरिषदेचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.