🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचाप -वेंगुर्ला /प्रतिनिधी-
सावंतवाडी येथील जे.बी.नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय येथे १२ डिसेंबर रोजी हुतात्मा बाबू गेनू पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात बाबू गेनू यांचे स्वदेशी विषयीचे कार्य, त्यांची देशभक्ती याविषयी प्रा.मृण्मयी बांदेकर-पोकळे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.प्रसाद जाधव यांनी स्वदेशीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपण दैनंदिन जीवनात स्वदेशीचा अंगीकार कशा पद्धतीने करू शकतो याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही स्वदेशीबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता ठाकूर-केळूसकर, एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी सोनाली परब, प्रा.औदुंबर वेजरे, संतोष पंडित, रेश्मा कर्पे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रसाद जाधव यांनी मानले. https://sindhudurgsamachar.in/kokan-केळूस-मोबार-रस्त्याने-घे/
फोटोओळी – जे.बी.नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय येथे हुतात्मा बाबू गेनू पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.