🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /सिंधुदुर्ग/अभिमन्यू वेंगुर्लेकर
मतदान करणे हा सर्वसामान्य जनतेचा एक अधिकार व कर्तव्य आहे. मागील काही वर्षांमध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये झालेली घट, तसेच सुशिक्षित वर्गाची मतदानाविषयी नकारात्मकता याचा विचार करता शासनाने विविध प्रकारे मतदान करण्याविषयी जनजागृती सुरू केली आहे. तसेच वयोवृद्ध,अपंग मतदारांसाठी गृहमतपेटीची सुविधाही केली तरी देखील अनेक वृध्द अपंग आपला मतदानाचा अधिकारा वाचून मुकले कारण यांना गृह मतदान सोय न मिळाल्या मुळेच…त्यामुळे जिल्हातील सरास मतदान केंद्रावर वयोवृध्द मतदार शारीरीक पिडा सहन करत मनाची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आढळून आले. यात ७५ ते ९० वर्षाच्या मतदाराना समावेश होता काही स्व:ताहून मतदान केंद्रात थरथरत शरीर घेऊन उत्साहात चालत येत होते तर काहींना धरून उचलून आणले जात होते..त्यामुळे त्या वृध्दअपंगाची होणारी हेळसांड पाहून जनसामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत होता या मतदारांना गृहमतदानाची सोय असतांना त्यांना ती का.. मिळाली नाही.. असा प्रश्न उपस्थित होतो आहे..https://sindhudurgsamachar.in/kokan-हुमरमळा-श्री-देव-रामेश्व/