🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /वेंगुर्ला प्रतिनिधी/
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित ६३वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १ ते ८ डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्यस्पर्धा होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांच्यावतीने समन्वयक प्रशांत आपटे यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-राजापूर-मतदार-संधातून-कि/ स्पर्धा
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेची माहिती समन्वयक संस्था म्हणून काम पहाणार्या माझा वेंगुर्ला संस्थेच्या पदाधिकार्यांनी स्पर्धेबाबत अधिक माहिती दिली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव राजन गावडे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, पदाधिकारी निलेश चेंदवणकर, कपिल पोकळे, सीमा मराठे, यासीर मकानदार, जयप्रकाश चमणकर आदी उपस्थित होते.
यावर्षीपासून हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सिधुदुर्ग हे स्वतंत्र केंद्र म्हणून मान्यता मिळालाी आहे. हे वर्ष वेंगुर्ल्याचे सुपूत्र तथा थोर नाटककार जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या थोर नाटककाराच्या जन्मगावी म्हणजेच वेंगुर्ला येथे राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या सिधुदुर्ग केंद्राला शुभारंभाचा मान मिळाला आहे. वेंगुर्ला येथील नाट्यप्रेमींना तब्बल आठ नाटकांची मेजवानी लाभणार आहे. रोज सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
१ डिसेंबर रोजी कलावलय वेंगुर्ल्याचे चार मुलांचा बाप, २ रोजी मायभूमी प्रतिष्ठान सावंतवाडीचे मिशन ५९, ३ रोजी वेताळ प्रतिष्ठान तुळसचे तन माजोरी, ४ रोजी सातार्डा मध्यवर्ती संस्था कवठणीचे गावय, ५ रोजी सिद्धांत फाऊंडेशन सिधुदुर्ग-पिगुळीचे तुम्हाला काय वाटतं?, ६ रोजी श्री राधाकृष्ण संगीत साधना सिधुदुर्ग यांचे सौजन्याची एैसीतैसी, ७ रोजी जीवनदायी विकास संस्था उभादांडा यांचे सूर्यास्त, ८ रोजी इंद्रधनू कलामंच दाभोली यांचे श्याम तुझी आऊस इली रे हे नाटक सादर होणार आहे.
गतवर्षी वेंगुर्ल्यात झालेल्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेचे सर्वच्या सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले होते. यावर्षीही वेंगुर्ला व लगतच्या परिसरातील नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माझा वेंगुर्ला तर्फे करण्यात आले आहे. फोटोओळी – पत्रकार परिषदेत माझा वेंगुर्ल्याच्या पदाधिकार्यांनी नाट्य स्पर्धेबाबत माहिती दिली.