Kokan:कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम तीव्र; फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

0
45
गणेशोत्सव, कोकण-गोव्यापर्यंत नियमित रेल्वे गाड्या सोडाव्यात
पश्चिम रेल्वेनेही कोकण-गोव्यापर्यंत नियमित रेल्वे गाड्या सोडाव्यात -मोहन केळुसकर

काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. एप्रिल 2024 मध्ये एकूण 15,129 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ₹2,69,85,256/- दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtrahit-run-case-विशाल-अग्रवालसह-तिघा/

एप्रिल 2024 मध्ये प्रकरणांची संख्या 15,129 होती, तर फुकट्या प्रवाशांकडून एकूण₹2,69,85,256/- दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. येणाऱ्या काळात हि KRCL च्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहिम सुरू राहणार आहे. “अभिमानाने प्रवास करणार, सन्मानाने प्रवास करणार, तिकीट काढून अभिमानाने प्रवास करा असा आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here