⭐या घटणेची कोणत्याही प्रसारमाध्यमांनी दखल न घेतल्याने तसेच गावातील राजकीय पुढारी मुग गिळून असल्याने नाराजी
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ-
– वालावल मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी सुतार काम व्यावसाईक असून त्याच्या घरापासून काही अंतरावर त्या अल्पवयीन मुलगी राहते. ती मुलगी आरोपीच्या नातवंडांशी खेळ खेळत असे. पण वासनाध बुध्दीच्या नराधमाने तीच्या अल्पवयाचा विचार न करता अत्याचार केला. अशी विकृत घृणास्पद प्रकार घटना वालावल गावात घडूनही प्रसार माध्यमे तसेच राजकीय पुढारी मुग गिळून राहील्याने ग्रामस्थांनी नाराजी व्याक्त केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-म्हापण-येथे-कै-माजी-आमदार/
अल्पवयीन पीडीत मुलीचे कुटूंब अत्यंत गरीब असून त्यांच्या याच गरीबीचा, गरीब स्वभावाचा गैरफायदा सदर आरोपीने उचलला आहे आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पिडीतेच्या कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी केली आहे.