कुडाळ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.अनंत लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वाड.मय चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे या प्रसंगी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले तसेच त्यांचा जीवनावर आधारित ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-पर्यावरण-व-वातावरण-बदल-वि/
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रॉब्लेम रुपी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीमधील योगदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आरक्षण विषयी भूमिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायातील योगदान, हिंदू कोड बिल अशा विविध विषयांवर प्राध्यापकांनी आपले मते व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अशा प्रकारचे कार्यक्रम हे महाविद्यालयात हे यापुढेही घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. साईनाथ लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन एन.सी. सी. समन्वयक कॅप्टन डॉ.एस. टी. आवटे यांनी केले.