Kolhapur:  ऊर्जा सुरक्षेचा सल्ला – सौरऊर्जा हा बालेकिल्ला

0
77
ऊर्जा सुरक्षेचा सल्ला - सौरऊर्जा हा बालेकिल्ला
भविष्यातील ऊर्जासंकटावर मात करण्यासाठी कडेकोट बंदोबस्ताकरीता सौरछताची उभारणी करून घरोघरी सौर ऊर्जा वापरावर लक्ष केंद्रीत करण्यात अग्रेसर झाले पाहिजे.

कोल्हापूर : ‘ऊर्जा सुरक्षेचा सल्ला – सौरऊर्जा हा बालेकिल्ला’ हा विचार ध्यानी घेऊन भविष्यातील ऊर्जासंकटावर मात करण्यासाठी कडेकोट बंदोबस्ताकरीता सौरछताची उभारणी करून घरोघरी सौर ऊर्जा वापरावर लक्ष केंद्रीत करण्यात अग्रेसर झाले पाहिजे. ऊर्जा सुरक्षेच्या कामगिरीसाठी सौरउर्जेच्या दिशेने एक एक पाऊल पुढे पडते आहे. या मोहिमेत व्यापक प्रमाणात नागरिकांचा सहभाग होणे, भविष्याच्या दृष्टीने लाभदायक  ठरणार आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-विविध-कार्यक्रमांनी-मु/

शाश्वत विकास ध्येयाअंतर्गत किफायतशीर आणि स्वच्छ ऊर्जा, संसाधनाचा सुयोग्य वापर आणि निर्मिती, वातावरणीय बदलांना अनुरूप कृती ही उद्दिष्ट्ये ठेवून  धोरणे आखली जात आहेत.  पारंपारिक  ऊर्जा निर्मितीचा वाढता खर्च आणि  पर्यावरण प्रदुषण यातून सुटका म्हणजे स्वच्छ ऊर्जा संक्रमण अर्थात पवन, सौरऊर्जेसारख्या शाश्वत, विपुल प्रमाणात उपलब्ध आपांरपारिक स्त्रोतांकडे गतीने वळणे होय. केंद्राने वार्षिक 50 हजार मेगावॅट हरीत ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवल्याचे नुकतेच जाहिर केले आहे.

र्जा सुरक्षेच्या कामगिरीसाठी सौरउर्जेच्या दिशेने एक एक पाऊल पुढे

केंद्र सरकारचे प्रोत्साहान- वापरकर्तेच निर्माते व्हावेत

सौरवापराचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रोत्साहन स्वरूपात केंद्रशासन योजना राबवित आहे. संघटीत सार्वजनिक प्रयत्नासोबत वैयक्तिक पातळीवर वापरकर्तेच निर्माते झाले पाहिजेत, अशीही केंद्रसरकारची भुमिका दिसून येते.  केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅटपर्यंत सौरछत संचास 40 टक्के तर पुढील 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान आहे. सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे. सौरछत संच अनुदानासाठी प्रतीकिलोवॅटप्रमाणे संचाचे मुलभूत दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत. 1 ते 3 किलोवॅटकरीता रू.41400/-, 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटकरीता रू.39600/-, 10 ते 100 किलोवॅट करीता रू.37000/- तर 100 ते 500 किलोवॅटकरीता रू.35886/- असे दर आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 328 घरगुती वीज ग्राहकांनी 1261 किलोवॅट तर सांगली जिल्ह्यातील 147 ग्राहकांनी 493 किलोवॅट क्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्वे, एजन्सी निवडसुची, शंका-समाधान इ. माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकवर अर्ज सादर करता येईल.

सोलर रुफ टॉपसाठी किती जागा लागते? किती क्षमतेचे बसवावे ? फायद्याची आहे काय?

१ किलोवॅट क्षमतेची सोलर रुफ टॉप यंत्रणा बसविण्यासाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेचे वजन जवळपास 150 किलो असते.  १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉपमधून वार्षिक सरासरीनुसार महिन्याला १२० युनिट वीज निर्मिती होते. सौर पॅनलची कार्यक्षमता व सौर किरणांची उपलब्धता, भौगोलिक स्थान या घटकांचा प्रभाव एकंदरीत वीजनिर्मितीवर पडतो. स्थानिक बाजार मूल्यानुसार १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेसाठी ५० ते ५५ हजार रुपये दरम्यान खर्च येतो. सोलर पॅनलचा दर्जा, उपलब्ध जागा या घटकांचा दरावर परिणाम होतो.  किलोवॅट क्षमता वाढल्यास खर्च कमी होत जातो. मासिक वीज बिलात बचत होऊन साधारणपणे सोलर रुफ टॉपसाठी गुंतविलेल्या रक्कमेची ४ ते ५ वर्षात परतफेड मिळते. पॅनलची स्वच्छता राखणे, नियमित देखभाल दुरूस्तीमुळे सौरपॅनलची कार्यक्षमता व आर्युमान वाढते.

केंद्राच्या प्रोत्साहान योजनेतून कोल्हापूर, सांगलीत 475 सौरछते 

कोल्हापूर, सांगलीत सौरउर्जेच्या दिशेने ग्राहकांची पाऊले पडत आहेत. आतापर्यंत 475 घरगुती  वीजग्राहकांनी 40 टक्के अनुदान योजनेचा लाभ घेऊन 1 हजार 754 किलोवॅट क्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे.  618 वीजग्राहकांच्या (2 हजार 95 किलोवँट) अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.वैयक्तिक पातळीवर स्वखर्चाने अर्थात  विनाअनुदानित सौरछत यंत्रणा बसविण्यात कोल्हापूर, सांगलीकरानी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 2704 व  सांगली जिल्ह्यातील 1519 विविध वर्गवारीतील ग्राहकांनी  बसविली आहे. त्या सौरछत यंत्रणेची आस्थापित क्षमता अनुक्रमे 50 हजार 825 किलोवँट व 27 हजार 878 किलोवँट आहे. वीज ग्राहक दरमहा सौरद्वारे  1 कोटी युनिट पॆक्षा अधिक वीज निर्मिती करित आहेत. सौर ऊर्जा वापर हा एक हरीत विचार आहे. तो वसुंधरेच्या, मानवतेच्या कल्याणाचा एक विचार आहे. तेंव्हा हरीत विचाराचा अंगिकार करून जगणे  सुकर , ऊर्जासमृध्द करूया ! ‘ऊर्जा सुरक्षेचा सल्ला – सौरऊर्जा हा बालेकिल्ला’ हा विचार पुढे नेऊया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here