Kolhapur: आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली

0
33
आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली

कोल्हापूर: आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 अश्विन शुद्ध नवरात्राच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे. बादामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्या वेळेला अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली त्यावेळेस जगदंबेने प्रगट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते.

प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र संपन्न केले जाते. शाकंभरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची आजची शाकंभरी रूपातली अलंकार पूजा गजानन मुनीश्वर मुकुंद मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here