Kolhapur : कागल तिहेरी हत्याकांडाने हादरले

0
100
कर्वेनगरमधील विद्यार्थी लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षण संस्थाचालकाला अटक
पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पुणे पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे

कागल(समाचार वृत्तसेवा)-

कागल शहरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली. पत्नी ,मुलगा आणि मुलगी तिघांची गळा आवळून हत्या करण्यात आली. प्रकाश बाळासो माळी(वय ४२) संशयीत आरोपी इसमाचे नाव असून हे हत्याकांड दुपारी दोन ते रात्री आठ या दरम्यान घडले. काळम्मावाडी घरकुल वसाहतीत तापी संकुलमधील दोन नंबर खोलीत पत्नी मुलगा, मुलगी संशयीत आरोपी राहत होता. घटना घडली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. त्या वेळी पत्नी गायत्री (वय ३७) मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. हा राग मनात धरून आरोपीने तीच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर भांडणात होऊन आरोपीने तीचा गळा आवळून भांडण कायमच संपवल.

सायंकाळी साडेपाच वाजता शाळेत गेलेला कृष्णात (वय १४) हा पोलीओग्रस्त मुलगा अंपग होता. आईची अवस्था पाहून त्याने वडीलांना असे का केल तुम्ही असे विचारले असता संशयीत आरोपी प्रकाश याच्या मनात आपल्या पश्चात मुलांचे काय हाल होतील या विचारातून त्याने मुलगा कृष्णा याचाही दोरीने गळा आवळून हत्या केली. त्या नंतर कामानिमीत्त बाहेर गेलेली मुलगी अदिती (वय १७) ही रात्री आठच्या सुमारास घरी आली असता घरातील परिस्थिती पाहून भेदरली ती आरडा ओरड करीत असल्याचे पाहून संशयीत आरोपी प्रकाशने तीच्या डोक्यात वाटप वाटायचा वरवंटा मारून तीला जखमी केले मग दोरीने तीचाही गळा आवळून ठार मारले.

प्रकाश हा हमीतवाडा कारखान्यात कामगार होता. पत्नीच्या चारित्र्यावर प्रकाश संशय घेत असे. यातून पती पत्नीस नेहमी भांडणे होत असत .तसेच पत्नी मुलांना रोज मारीत असे असे प्रकाशचे म्हणने आहे. मुलगा कृष्णात आठवीच्या वर्गात तर मुलगी अकरावीच्या वर्गात शिकत होती. तिघांचा खुन केल्यानंतर आरोपी प्रकाश स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. प्रकाशने घटना कथन केल्या उपरांत पोलिसांनी घटनास्थळ गाठले. कागल शहरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली.घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती ही घटना समजताच पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे,हे घटनास्थळी तातडीने हजर झाले आहे.फ्लाॅरंसिक लॅबच्या तज्ञांना पाचारण करून संशयीत आरोपी प्रकाश यास ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here