Kolhapur: पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण

0
33
चारचाकी वाहनांचे वितरण
पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण

जिल्हा परिषदेच्या आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल व शिरोळ या पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे आज सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई तसेच सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-प्रजासत्-2/

केंद्र सरकार व  राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून गट विकास अधिकारी यांना गावपातळीवर भेटी देण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरतील. ही वाहने  जिल्हा परिषदेच्या निधीतून घेण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here