Kokan: भा.ज.पा.युवा मोर्चा तालुका संघटनात्मक बैठक दोडामार्ग तालुका कार्यालयात संपन्न

0
10
भा.ज.पा.युवा मोर्चा तालुका संघटनात्मक बैठक दोडामार्ग तालुका कार्यालयात संपन्न
भा.ज.पा.युवा मोर्चा तालुका संघटनात्मक बैठक दोडामार्ग तालुका कार्यालयात संपन्न

दोडामार्ग /प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका संघटनात्मक बैठक दोडामार्ग तालुका कार्यालयात आज संपन्न झाली .यावेळी या बैठकीला मंडळ अध्यक्ष सुधीर दळवी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराशर सावंत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण माजी युवा मोर्चा अध्यक्ष दीपक गवस माजी तालुका अध्यक्ष प्रवीण गवस युवा मोर्चा उपाध्यक्ष दौलतराव देसाई युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष भिवा नाईक युवा मोर्चा चिटणीस अजय दळवी दोडामार्गशहर अध्यक्ष राजेश फुलारी युवा मोर्चा शहर अध्यक्ष मिलिंदनाईक ,आकांशा शेटकर माटने सरपंच महादेव नाईक व युवामोर्चा पदाधिकारी युवा मोर्चा बूथ अध्यक्ष उपस्थिस्त होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिरोडा-वेळागर-पंचतारांक/

या घेण्यात आलेल्या बैठकीत युवा मोर्चा बूथ आढावा , बूथ रचना यावर चर्चा करण्यात आली. युवा मोर्चा कार्यकर्त्यांना तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी मार्गदर्शन केले. तसेच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी युवकांना भारतीय जनता पार्टी मध्ये भविष्य आहे. तसेच पुढील विधान सभेसाठी भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर निवडणूक सावंतवाडी विधानसभा लडवावि असे सर्व युवा मोर्चा कार्यकर्त्यांचे मत विचारात घेवून तसा ठराव ही घेण्यात आला. या ठरावाला युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दौलतराव देसाई यांनी ठराव मांडला व युवा मोर्चा पदाधिकारी दीपक गवस यांनी त्याला अनुमोदन दिले. तसेच सर्व युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी हात उंचावून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच महायुती म्हणून वरिष्ठ जो आदेश देतील तो निर्णय अंतिम मानून महायुती म्हणून काम करण्यात येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले. युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी सर्व युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे यांचे आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला.

यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष भिवा नाईक,अर्जुन गवस,अजय दळवी,रमा तेंडुलकर,दत्तप्रसाद नाटेकर, अनंत गवस,वसंत झोलंबेकर,रितेश गवस,नितेश गवस,संदेश गवस,शिवराम दळवी,सूरज गवस,आदित्य देसाई,सुधीर शिरोडकर,शैलेश शिरोडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here