Maharashta: परदेशातील पदव्युत्तर अभ्यासासाठी यंदा 90 विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती

0
27
KCMET,
परदेशातील पदव्युत्तर अभ्यासासाठी यंदा 90 विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती

3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख; 55 जणांना प्रत्येकी 5 लाख आणि 32 जणांना प्रत्येकी 1 लाख अशी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

मुंबई, 19 जुलै, 2024 : के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट (KCMET) ने के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत 90 हुशार, चुणचुणीत विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल. दिवंगत के.सी. महिंद्रा यांनी 1953 मध्ये या शिष्यवृत्तीस सुरुवात केली. महिंद्रा ट्रस्टमार्फत दिली जाणारी ही शिष्यवृत्ती म्हणजे व्याजमुक्त कर्ज आहे. उत्कृष्ट शैक्षणिक आणि अभ्यासेतर गोष्टींमध्ये आघाडीवर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ती दिली जाते.https://sindhudurgsamachar.in/kokan-मसुरे-मायने-वाडी-येथे-डों/

शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील. यात राज पटेल, अस्मिता सूद आणि सावली टिकले यांचा समावेश आहे. राज पटेल प्रिन्स्टन विद्यापीठात फायनान्सचा अभ्यास करणार आहेत; अस्मिता सूद स्टॅनफोर्ड विद्यापीठात बायोमेडिकल डेटा सायन्स शिकणार आहे आणि सावली टिकले हार्वर्ड विद्यापीठात आर्किटेक्चर अभ्यासणार आहे. 55 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 लाख आणि 32 विद्यार्थ्यांना त्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या वर्षीच्या गटातील अपवादात्मक गुणवत्ता आणि प्रतिभा हेरत ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच, मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे.

ट्रस्टकडे यंदा एकूण 2,354 अर्ज आले होते. यापैकी 90 विद्यार्थ्यांची दोन दिवस मुलाखत घेण्यात आली. या निवड समितीमध्ये महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, रंजन पंत, महिंद्रा अँड महिंद्राचे बोर्ड सदस्य, महिंद्रा समूहाच्या मुख्य माहिती अधिकारी ऋचा नानावटी, केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त भरत दोशी, उल्हास यरगोप आणि ATLAS स्किलटेक विद्यापीठाच्या अध्यक्ष आणि कुलपती डॉ. इंदू शहानी यांचा समावेश होता.

निवडलेल्या उमेदवारांमध्ये 29 IIT पदवीधरांचा समावेश होता, तर बाकीचे SRCC, LSR, कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्युट फॉर आर्किटेक्चर अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीज, NITs, BITS पिलानी आणि नॅशनल लॉ स्कूल यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी होते. या उमेदवारांना परदेशातील सर्वोच्च विद्यापीठ, तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. यामध्ये हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रत्येकी 13, कार्नेगी मेलॉन येथे 8, ऑक्सफर्ड आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात प्रत्येकी 6, कोलंबिया आणि एमआयटी येथे प्रत्येकी 5, येल, शिकागो विद्यापीठ, जॉन हॉपकिन्स आणि केंब्रिज येथे प्रत्येकी 3, प्रिन्स्टन, जॉर्जिया टेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे प्रत्येकी 2, अशी विद्यार्थ्यांची विभागणी झाली आहे.

शिष्यवृत्तीबद्दल बोलताना, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “केसीएमईटी पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज ॲब्रॉड स्कॉलरशिपच्या माध्यमातून भारतातील काही हुशार आणि चुणचुणीत तरुणांसोबत गप्पा मारण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा हा एक समृद्ध अनुभव आहे. या संधीची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

के.सी. महिंद्रा शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी कृपया www.kcmet.org ला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here