Maharashtra : ड्रीम ११ कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा 

0
48
क्रिकेट स्पर्धा
ड्रीम ११ कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा

शाहिद खानच्या शतकाने शास्त्री संघ २२९चिन्मय दुखंडेचे  बळी

मुंबई, २७ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दोन दिवसीय  साखळी लढतीत रवी शास्त्री संघाने शाहिद खानच्या (१०४ धावा) शतकी खेळीमुळे सर्वबाद २२९ धावा केल्या. याच लढतीत  वेंगसरकर संघाच्या लेगस्पिनर  चिन्मय दुखंडे याने ४० धावांत ६ बळी घेण्याची करामत   केली. पहिल्या दिवसाअखेर वेंगसरकर संघाने बिनबाद ८३ धावा करत जोरदार प्रदर्शन केले आहे.  कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत गावस्कर संघाने तेंडुलकर संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिवसाखेर ९ बाद २४९ धावा केल्या आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtraकेंद्रीय-मंत्री-रामदास/

रवी शास्त्री संघाचा शतकवीर शाहिद खान (१०४धावा) आणि दिलीप वेंगसरकरसंघाचा चिन्मय दुखंडे (४०धावांत६बळी) .

ओव्हल मैदानावरील लढतीत रवी शास्त्री संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिद खान याने ११५ चेंडूत १२ चौकारांसह १०४ धावा करताना पाचव्या विकेटसाठी पार्थ ठाकूर (२७) यांच्यासह ९८ धावांची भागी रचली. आयांश चित्कारा (२१) आणि वेदांत कडू (१९) यांनीही संघाच्या धावसंख्येत थोडी भर टाकली.  वेंगसरकर संघाच्या चिन्मय दुखंडे याने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने ४० धावांत ६ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला ६७ षटकांतच २२९ धावांवर रोखण्याची करामत केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अरहाम जैन (खेळात आहे ३५) आणि ईशान पाठक (खेळात आहे ४०) या सलामीवीरांनी २५ षटकांत ८३ धावांची अभेद्य भागी रचत वर्चस्व राखले आहे.

कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत सुनील गावस्कर  संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद २४९ धावांची मजल मारली आहे. ७ बाद १५९ अशा डळमळीत अवस्थेनंतर  कर्णधार शेन रझा (५२) याच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि त्याने आठव्या विकेटसाठी आयुष गोहो  (२२) यांच्यासह केलेल्या ४२ धावांच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे ही मजल मारली आहे. गावस्कर संघासाठी स्वानंद पालव (२८), स्मित ठाकूर (३१), वेदांग मिश्रा (४८) यांनीही  फलंदाजीत योगदान दिले. तेंडुलकर संघासाठ कर्णधार हर्ष कदम याने ३३ धावांत ४ बळी  तर मोक्ष निकम याने ५७ धावांत ३ आणि हार्दिक गजमल याने ४९ धावांत २ बळी मिळविले आहेत. उद्या सामनाच दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.

संक्षिप्त धावफलक –  ओव्हल मैदान =  रवी शास्त्री संघ – ६७ षटकांत सर्वबाद २२९ (आयांश चित्कारा २१, शाहिद खान १०४, पार्थ ठक्कर २७, वेदांत कडू १९; चिन्मय दुखंडे ४० धावांत ६ बळी) विदिलीप वेंगसरकर संघ – २५ षटकांत बिनबाद  ८३ (अरहाम जैन खेळत आहे ३५, ईशान पाठक खेळात आहे ४०).

कर्नाटक सपोर्टींग = सुनील गावस्कर संघ – ९५ षटकांत  बाद २४९ (स्वानंद पालव २८, स्मित ठाकूर ३१, वेदांग मिश्रा ४८, शेन रझा ५२, आयुष गोहो २२; हार्दिक गजमल ४९ धावांत २ बळी, हर्ष कदम ३३ धावांत ४ बळी, मोक्ष निकम ५७ धावांत ३ बळी)विसचिन तेंडुलकर संघ.

                                                            ***********

विजय बने – ९८१९०५९६७७

फोटो ओळी –  रवी शास्त्री संघाचा शतकवीर शाहिद खान (१०४ धावाआणि दिलीप वेंगसरकर संघाचा चिन्मय दुखंडे (४० धावांत  बळी) .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here