मुंबई– पावसाळ्यापूर्वी 31 मे पर्यंत सगळं नाले सफाई काम पूर्ण करण्याचं महापालिकेने ठरवलं आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथे पाहणी करायला आले होते. नालेसफाईचा बेचाळीस कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे पावसाळ्यापूर्वी ही सगळी काम पूर्ण करावी त्यांनी अधिकाऱ्यांना आदेशही दिले आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ले-बोट-दुर्घटनेत/
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील मिठी नदीच्या प्रमुख नाल्यांच्या स्थळांच्या पाहणीदरम्यान, आठवले यांनी गाळ काढण्याच्या कामात गुंतलेल्या कामगारांशी संवाद साधला आणि या कामांच्या कसून अंमलबजावणीच्या महत्त्वावर भर दिला. पाणी साचण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या ठिकाणी उच्च दाबाचे पंप लावावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात भूस्खलन प्रवण भागात आणि जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना तात्पुरती घरे उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले. या पाहणीच्यावेळी त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारीही होते.