स्विच मोबिलिटीने वितरित केले क्रांतिकारी उत्पादन, ग्राहकांना सोपवले SWITCH IeV3 वाहन!
दिल्ली, १८ जुलै २०२४ : हिंदुजा समूहातील इलेक्ट्रिक बसेस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांची जागतिक उत्पादक कंपनी असलेल्या स्विच मोबिलिटीने 1.25 टन पेलोड श्रेणीतील बहुप्रतीक्षित SWITCH IeV3 च्या चाव्या सुपुर्द करून, शाश्वत शहरी लॉजिस्टिक्समध्ये महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-पाढ्यांची-कार्यशाळा-चार/
स्विच मोबिलिटीचे सीईओ श्री महेश बाबू यांनी ग्राहकांना SWITCH IeV3 वाहनांच्या चाव्या सुपुर्द केल्या. अतुलनीय कार्यक्षमता आणि कार्यप्रदर्शन प्रदान करणाऱ्या उत्तम उत्पादनांसह भारतातील शाश्वत गतिशीलतेत भर घातली आहगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये SWITCH IeV3 प्रदर्शित करण्यात आला होता, या महिन्यात होसूरमधील उत्पादन लाइनमध्ये तयार केला गेला आणि आता भारतातील 30 डीलरशिपवर उपलब्ध आहे.
स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू यांनी आपला उत्साह व्यक्त करत सांगितले की, “जग आज एकत्रितपणे विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांसह अधिक शाश्वत भविष्याकडे प्रयत्न करत आहे, जे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात. प्रत्यक्ष प्रभाव पाडणारे अग्रगण्य उपाय आणून या चळवळीचे नेतृत्व केल्याबद्दल स्विच मोबिलिटीला अभिमान वाटतो. आज स्विचचा पहिला संच सुपुर्द करताना आम्हाला. आनंद होत आहे. आमच्या मूल्यवान ग्राहकांसाठी SWITCHIeV3 आमच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रगत बॅटरी तंत्रज्ञान, प्रभावी श्रेणी आणि कौशल्यपूर्ण डिझाइनसाठी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य समाधान प्रदान करते. त्याच्या स्पर्धात्मक किमतीमुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीला व्यवसायांच्या विस्तृत श्रेणीसाठी विशेष निवडले आहे, ज्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, SWITCH IeV3 इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहतुकीत क्रांती घडवून आणेल आणि त्याचे भविष्य घडवेल.”
SWITCH IeV3 हे 25.6 kWh बॅटरी आणि 1250 kg पेलोड क्षमता असलेले एक इंटलिजंट इलेक्ट्रिक लाइट व्यावसायिक वाहन आहे. हे एक प्रशस्त मालवाहतुकीची क्षमता असलेले आणि 140 किमी रेंज देते, सुरक्षित, आरामदायी आणि कार्यक्षम ऑपरेशन्स सुनिश्चित करते. 40 kW मोटर आणि 190 Nm टॉर्कसह सुसज्ज असलेले SWITCH IeV3 मजबूत कामगिरी प्रदान करते. या व्यतिरिक्त SWITCH iON सिस्टीम एक प्रोप्रायटरी कनेक्टेड टेक्नॉलॉजी टेलीमॅटिक्स सोल्युशन, वाहनाची कार्यक्षमता आणि कार्यतत्परता वाढविते. ही प्रगत टेलिमॅटिक्स प्रणाली रीअल-टाइम डेटा आणि विश्लेषणे प्रदान करते, ज्यामुळे व्यवसायांना त्यांच्या फ्लीट ऑपरेशन्सचे जलद आणि अधिक किफायतशीर व्यवस्थापनासाठी देखरेख व ऑप्टिमाइझ करण्यास सक्षम करते.