नवी दिल्ली- आपल्या सर्वांना जीवनात कशा प्रकारे ‘आधारसोबती’ची गरज असते याबद्दल ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेवर प्रकाश टाकत वेदांताचे अध्यक्ष श्री. अनिल अगरवाल यांनी इन्स्टाग्रामवर त्यांची पहिली रील शेअर केली.https://sindhudurgsamachar.in/कोकण-रत्नागिरी-व-सिंधुदु/
वेदांत हे भारतातील आघाडीचे नैसर्गिक संसाधनाचे महामंडळ आहे आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी वचनबद्ध आहे. रीलमध्ये, वेदांत अध्यक्ष पटना येथील बसमधून प्रवासाचे अनुभव सांगताना दिसत आहेत. बसमध्ये नेहमी गर्दी कशी असायची आणि सुरक्षित राहण्यासाठी आणि तोल सांभाळण्यासाठी हँडल पकडणे कसे अत्यावश्यक होते याविषयी विचार करायला लावणारी आठवण ते सांगतात. आपल्याला आशा आणि शक्ती मिळावी यासाठी लोक एखाद्या गोष्टीला किंवा कोणाला तरी धरून ठेवतात, मग ते पालक असोत, त्यांचे गुरु, देव असे कुणीही असो हे दर्शवण्यासाठी या संदर्भात “हँडल” हा शब्द एक रूपक म्हणून वापरला गेला आहे.
इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांच्या सहभागामध्ये गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२२ मध्ये या प्लॅटफॉर्मवरील रीलची संख्या दुप्पट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अनिल अगरवाल यांच्या इंस्टाग्राम रील वेदांत अध्यक्षांना लोकांशी त्यांचा संपर्क वाढवण्यामध्ये, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता एक व्यासपीठ सुनिश्चित करण्यासाठी भरपूर वाव देतात.
इंस्टाग्रामच्या जोडीला वेदांत अध्यक्ष २६ जुलै २०२१ पासून ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटचे सक्रिय सदस्य देखील आहेत. ट्विटरवर ते व्यवसायापासून खेळापर्यंतच्या विविध विषयांवर आधारित आशय आणि अभ्यासपूर्ण भाष्य नियमितपणे पोस्ट करत असतात.
रील- https://www.instagram.com/reel/CoXHX9BOdji/?igshid=MDJmNzVkMjY=
त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलची लिंक:
इंस्टाग्राम https://www.instagram.com/anilagarwal_vedanta/ ट्विटर https://twitter.com/AnilAgarwal_Ve
https://www.instagram.com/reel/CoXHX9BOdji/?igshid=MDJmNzVkMjY=


