Maharashtra:महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा 5 नोव्हेंबरला घेण्यात येणार

3
284
MPSC सन 2023 च्या विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022 ही जाहिर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यातील दोन उपकेंद्रावर शनिवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा एका सत्रामध्ये म्हणजे सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-कॅन्सरग्रस्त-रुग्णांस/

या परिक्षेला एकूण 526 उमेदवार बसणार असून, परिक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे. उपकेंद्र- विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली येथील बैठक व्यवस्था – KD००१००१ ते KD००१३३६ आणि कणकवली कॉलेज कणकवली (जुनी इमारत) येथील बैठक व्यवस्थाKD००२००१ ते KD००२१९० अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटी-प्रवासात-आजपासून-5-त/

3 COMMENTS

  1. […] आज प्रथित यश असलेल्या सिंधुदुर्गातील लेखक कवींचे साहित्य सुरुवातीला किरातमधूनच प्रसिद्ध झाले होते. सर्वसमावेशकता हेही किरातचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे मत वीरधवल परब यांनी व्यक्त केले. किरात अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत साकारलेल्या मुखपृष्ठाचे कौतुक करत किरातच्या वाटचालीस सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. लक्ष लक्ष बलिदान लेवुन आज भारत भूमीला मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे असे मत ज्येष्ठ सदस्य अनंत आठल्ये यांनी व्यक्त केले. केदार देसाई यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेचे वाचन केले.http://sindhudurgsamachar.in/maharashtraमहाराष्ट्र-लोकसेवा-आय… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here