९ सीटर प्रवासी वाहन विभागात आघाडीचे स्थान घेण्यास सज्ज
· एंट्री-लेव्हल P4 आणि प्रीमियम प्रकार P10 मध्ये उपलब्ध
· रीयर-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये ६-स्पीड गिअरबॉक्ससह नावाजलेले २.२ लीटर mHawk डिझेल इंजिनने सुसज्ज
· प्रीमियम इटालियन इंटीरियर्स, ब्लूटूथ, यूएसबी आणि ऑक्स कनेक्टिव्हिटीसह २२.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह प्रीमियम फॅब्रिकमध्ये फिनिशिंग
· इंधन कार्यक्षमता वाढविण्यासाठी लागू केलेले मायक्रो-हायब्रिड तंत्रज्ञान
· यशस्वी बोलेरो नियो उत्पादन लाइनचा विस्तार
मुंबई, १६ एप्रिल २०२४: भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज P4 आणि प्रीमियम P10 या दोन प्रकारांमध्ये बोलेरो नियो+ ९ सीटर गाडीचे अनावरण केले. शैलीदार, प्रशस्त आणि मजबूत एसयूव्ही हवी असलेल्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या गाडीत ड्रायव्हरसह ९ प्रवासी आरामात बसू शकतात.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-साऊथच्या-जेलर/
बोलेरो नियो+ ९ सीटर बोलेरोच्या विश्वासार्ह, शक्तिशाली आणि कोठेही जा-ये करता येण्यासारख्या वैशिष्ट्यांवर आधारित असून नियोचे बोल्ड डिझाइन, प्रीमियम इंटीरियर्स आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ही एसयूव्ही मोठी कुटुंबे, संस्थात्मक ग्राहक, टूर आणि ट्रॅव्हल ऑपरेटर आणि कंपन्यांना वाहने भाड्याने देणारे कंत्राटदार यांच्यासारख्या ग्राहकांना एक वैशिष्ट्यपूर्ण प्रस्ताव सादर करते.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “बोलेरो ब्रँड गेल्या काही वर्षांपासून आमच्या ग्राहकांसाठी मजबूत आणि विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे आणि सातत्याने अपेक्षापूर्ती करत जास्त चांगली कामगिरी करत आहे. बोलेरो नियो+ सादर करून आम्ही प्रत्येक कुटुंबासाठी आणि फ्लीट मालकासाठी ड्रायव्हिंगचा अनुभव समृद्ध करत टिकाऊपणा, प्रगत वैशिष्ट्ये आणि सर्वोत्तम आराम सुनिश्चित करण्याचे आश्वासन देत आहोत.”
कुठेही जाण्याच्या क्षमतेसह शक्तिशाली:
बोलेरो नियो+ ही मजबूत 2.2 लिटर mHawk डिझेल इंजिनद्वारे समर्थित असून उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि कामगिरीसाठी मायक्रो-हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तिची बॉडी-ऑन-फ्रेम बांधणी आणि उच्च-शक्तीचे स्टील बॉडी शेल अत्युच्च टिकाऊपणा आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेले आहे. या एसयूव्ही मध्ये EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट्स, इंजिन इममोबिलायझर आणि ऑटोमॅटिक डोअर लॉक यासारखी सर्व प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करणारी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
स्टायलिश बोल्ड डिझाइन
बोलेरो नियो+ मध्ये सर्व साइड बॉडी क्लॅडिंगद्वारे पूरक वैशिष्ट्यपूर्ण बोलेरो घटक जसे की X-आकाराचे बंपर्स, क्रोम इन्सर्टने सुशोभित केलेले फ्रंट ग्रील आणि X-आकाराचे स्पेअर व्हील कव्हर हे आहे. तिचे अस्सल एसयूव्ही डिझाईन आणि आकर्षक स्वरूप स्टायलिश हेडलॅम्प, फॉग लॅम्प आणि कमांडिंग हुड ने आणखी वाढवले आहे. 40.64 सेमी अलॉय व्हील्स, मस्क्यूलर साईड आणि मागच्या बाजूच्या फूटस्टेप्स यासह असलेली बोलेरो नियो+ आत्मविश्वास आणि अभिजातता दर्शवते. याद्वारे ती कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरुन प्रवासाची हमी देते.
सुधारित अंतर्भाग आणि वर्धित आराम
बोलेरो नियो+ प्रीमियम इटालियन इंटिरियर्स आणि ब्लूटूथ, यूएसबी आणि ऑक्स कनेक्टिव्हिटीसह 22.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह अतुलनीय आराम देते. अँटी-ग्लेअर IRVM, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ORVM आणि उंचीनुसार अॅडजस्ट करता येणारी ड्रायव्हर सीट द्वारे अतिरिक्त आराम मिळतो. पुढील आणि मागील पॉवर विंडो, आर्मरेस्ट आणि प्रशस्त बूट स्पेससह सुसज्ज असलेली ही एसयूव्ही आराम आणि व्यावहारिकता दोन्ही सुनिश्चित करते. 2-3-4 पॅटर्नमध्ये मांडणी असलेल्या ९ आसनांचा समावेश असलेली वैशिष्ट्यपूर्ण आसन व्यवस्था विविध प्रकारच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करत प्रवासी आणि मालवाहू जागा दोन्ही वाढवते.
प्रकार आणि किंमत:
वेगवेगळ्या प्रकारच्या प्राधान्याला अनुसरून बोलेरो नियो+ P4 आणि P10 या दोन नवीन प्रकारांमध्ये सादर केले आहे. P4 हा एंट्री-लेव्हल पर्याय म्हणून काम करतो तर P10 अधिक प्रीमियम ट्रिम म्हणून बनविण्यात आला आहे. दोन्ही प्रकारांमध्ये प्रवासी आणि सामानासाठी पुरेशी जागा, चालकासह नऊ प्रवाशांना विना अडचण बसण्याची सुविधा आणि तिसऱ्या रांगेतील प्रवाशांना मागील बाजूने बाहेर पडण्याची सोय याला प्राधान्य देण्यात आले आहे.
देशभरात लोकांना परवडणारी, विश्वासार्ह सुविधा सादर करण्याच्या महिंद्राच्या बांधिलकीवर जोर देत वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करत या एसयूव्हीची किंमत ११.३९ लाख रु. (एक्स-शोरूम) पासून सुरू आहे.
बोलेरो नियो+ च्या एक्स-शोरूम किमती आहेत:
बोलेरो नियो+ P4 | बोलेरो नियो+ P10 |
११.३९ लाख रु. | १२.४९ लाख रु. |