Maharashtra: क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थास्थेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !

0
129
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !

ठाणे: विश्वनाथ पंडित 

मुंबई : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचा  आयोजित राज्यस्तरीय विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संस्थाध्यक्ष ॲड. राजन पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे पूर्व येथे पार पडला. यावेळी विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्हा-रूग्ण/

पर्यावरणपूरक सजावट स्पर्धेत प्रथम आशिष नाईक, अलिबाग, रायगड, द्वितीय दिनेश शेलार, कल्याण तृतीय अर्चित सारंग, नाशिक तर माझा बाप्पा या स्पर्धेत प्रथम संदीप पवार, ठाणे द्वितीय ऋग्वेद सागवेकर, मंडणगड, रत्नागिरी, तृतीय शिवम पवार, चिपळूण यांनी पटकावला, माझी गौराई स्पर्धा प्रथम क्रमांक सौ. रिमा पवार, गुहागर, द्वितीय दामिनी पवार, महाड,  तृतीय क्रमांक दिक्षा पवार, चिपळूण विजयी ठरले. रांगोळी स्पर्धेत प्रथम सौ स्नेहा माजळकर, डोंबिवली, ठाणे, द्वितीय  तानाजी पवार, ठाणे तृतीय सौ. गार्गी जोईल, मुंबई यांनी विजय प्राप्त केला.

गडकिल्ले स्पर्धा प्रथम क्रमांक कु. धिरज सुरकर व मित्रमंडळी, ठाणे द्वितीय क्रमांक बाळगोपाळ मित्रमंडळ, जोगेश्वरी, मुंबई तृतीय क्रमांक कु. आयुष बच्चीम, नायगाव, पालघर विजयी झाले.

राज्यभरातून या स्पर्धांसाठी भरघोस प्रतिसाद मिळाला. सौ. रसिला पवार, कु. ऋचा पवार व सौ. साक्षी पवार यांनी परिक्षक म्हणून योग्य कामगिरी बजावली. विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे यशस्वी आयोजन प्रसिध्दी प्रमुख संदेश पवार यांनी  केले. ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेत द्वितीय क्रमांक घेऊन चिपळूण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या श्री अभिषेक कृष्णा पवार यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी संस्थेची दिनदर्शिका २०२४ याचे वितरण करण्यात आले. उपाध्यक्ष श्री सचिन पवार यांनी स्पर्धा व दिनदर्शिका माहिती दिली, उपाध्यक्ष श्री संतोष पवार यांनी धारपवार इतिहास तर सचिव श्री अविनाश पवार यांनी संस्थेची वाटचाल माहिती दिली. अध्यक्ष ॲड राजन पवार यांनी स्पर्धक व विजेत्यांचे अभिनंदन करुन अशाच शप्रकारे सर्वांचे सहकार्य लाभावे बोलून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहखजिनदार श्री अमित पवार व सहसचिव श्री सुरज पवार यांनी केले. यावेळी खजिनदार श्री विकास पवार, कार्याध्यक्ष श्री सचिन पवार, सहकार्याध्यक्ष श्री सुशांत विश्वासराव, मुंबई, विविध तालुका, जिल्ह्यातील नागरिक, स्पर्धक व विजेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here