Maharashtra: ‘गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन संपन्न

0
53
'गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र' 
'गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन संपन्न

‘गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. यावेळी लेखक विलास कोळी, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार,  आर्किटेक्ट राहुल चेंबूरकर, प्रकल्प अभियंता प्रमोद साळूंखे, लेखापाल अंबादास सामलेटी, श्रीकांत देशपांडे, सारिका गायकवाड, पूजा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बी-अ-ट्रेलब्लेझर-येझ्द/

यावेळी लेखक विलास कोळी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी चित्रात शोधलं, कोणी पुस्तकात शोधले, कोणी फोटोत शोधलं, कोणी युद्ध तंत्रात शोधले, तर कोणी चौकातील स्मारकामध्ये शोधले. आम्ही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना गड किल्ल्याच्या बांधकाम तंत्रात शोधले.

आपल्या पूर्वजांनी गडकिल्ले कसे बांधले, त्याची निगा कशी राखली, त्याचे संरक्षण कसे केले. ते शिवधनुष्य त्यांनी कसे पेलले. याची इंत्यभूत माहिती म्हणजे ‘गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र’ हे पुस्तक आहे.

गड किल्ल्याबद्दलचे प्रेम दिवसेंदिवस गडप्रेमी मध्ये वाढत आहे. हे गड किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांच्या प्रचंड संख्येवरून लक्षात येते. गडकिल्ल्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लहान मुलांना तसेच शाळेमधील सहलीला आलेल्या मुलांना तेथील एलिमेंटसची माहिती नसते. जंग्या म्हणजे काय, फांजी म्हणजे काय, चर्या म्हणजे काय, बालेकिल्ला कशाला म्हणावे, चिलखती बुरुज कशास म्हणतात. अशा ऐतिहासिक वास्तूची माहिती नसते ती माहिती व्हावी म्हणून ‘गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र’ हे पुस्तक उत्तम गाईडची भूमिका बजावणार आहे. गड किल्ल्यातील एलीमेंटसची सर्व माहिती एकत्र मिळावी हा मुख्य हेतु असल्याचे लेखक विलास कोळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here