बिटरगाव (प्रतिनिधि) : गुरु रविदास यांच्या समाज सुधारण्याच्या परिवर्तनवादी सामाजिक कार्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता लोनाई यांचेही स्मरण करण्यात यावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणातील-आव्हानात्मक-भौ/
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे गुरु रविदासांची ६२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
आपल्या दोन तासाच्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदास यांना त्यांच्या माता पित्यानी घराबाहेर काढल्यानंतर ते गंगा नदीकिनारी झोपडी बांधून राहू लागले, त्यावेळी त्यांना त्यांची पत्नी माता लोनाई यांनी खंबीरपणे साथ दिली. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आदरातिथ्य केले. आजारी लोकांची सुश्रुषा केली. त्यांचे प्रबोधन केले, मार्गदर्शन केले. रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती केली. दुःख आणि दारिद्र्यात आपल्या पतीला हिम्मत दिली.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे पुणे जिल्हा प्रमुख हरिभाऊ खंदारे, ढाणकी शाखा प्रमुख गजानन सुरोशे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. प्रास्ताविक संभाजी वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचलन सौ. वंदना वाघमारे यांनी केले. किशन घोडके, दत्ता घोडके, गजानन गंगासागर, शेषराव घोडके, विश्वनाथ वाघमारे, दिगंबर वाघमारे, विठ्ठल वाघमारे, नागोराव वाघमारे, शिवाजी गंगासागर, भीमराव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
सौ. पुंजाबाई घोडके, रेणुकाबाई वाघमारे, देवकाबाई वाघमारे, सुनंदा गंगासागर, मनिषा गायकवाड, सुनिता गंगासागर, शिलाबाई वाघमारे, पार्वती घोडके, पारुबाई गंगासागर, शांताबाई घोडके, मुक्ताबाई वाघमारे आदी महिलांनीही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



[…] […]