विश्वनाथ पंडित(चिपळूण)
ठाणे : 16 एप्रिल 1853 या दिवशी मुंबई ठाणे दरम्यान पहिल्यांदाच धावलेल्या रेल्वेच्या ऐतिहासिक घटनेला 170 वर्षे पूर्ण झाली. हा आनंद सोहळा ठाणे रेल्वे स्थानकात 170 वा वाढदिवस म्हणून साजरा होणार आहे ही घटना आनंदायक आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सातार्डेकरवाडी-येथील-ट/
आज ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करीत असतात .मात्र या ऐतिहासिक स्थानकातील प्रवासी समस्या, अस्वच्छता, प्राथमिक गैरसोयी याकडे संबंधितांना लक्ष देण्यास, प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यास वेळच मिळाला नाही असे म्हटल्यास वावगे होईलच असे नाही. विशेष म्हणजे ठाणे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याबाबतच्या अनेक घोषणा ऐकत, अनेक नेते, लोकप्रतिनिधी यांची भाषणे ऐकतच आम्ही आणि आमच्यासारखे अनेक चाकरमानी सेवानिवृत्त झालोच शिवाय जेष्ठ नागरिक म्हणूनही सीमारेषा पार केली.
परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक झाल्याचे पहावयास काही मिळाले नाही, नव्हे जागेपणी पाहिलेले ते स्वप्न आजही स्वप्नच वाटते. ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच आजही जाणवतात. ऐतिहासिक ठाणे स्थानकाचे मासिक उत्पन्न सुमारे विस कोटीच्या आसपास देत असतांनाही या स्थानकात गैरसोयी आहेत.



[…] […]