Maharashtra: ड्रीम ११ कप (१४ वर्षंखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा 

0
33
ड्रीम ११ कप, क्रिकेट,
ड्रीम ११ कप (१४ वर्षंखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा धैर्य पाटीलच्या शतकी खेळीने गावस्कर संघाच्या २७७ धावा

धैर्य पाटीलच्या शतकी खेळीने गावस्कर संघाच्या २७७ धावा

मुंबई, २३ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुनील गावस्कर संघाच्या धैर्य पाटील (१०७ धावा) याच्या शतकी खेळीमुळे त्यांनी  दिलीप वेंगसरकर संघाविरुद्ध आपल्या पहिल्या डावात २७७ धावांची मजल मारली. कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत रवी शास्त्री संघाने सचिन तेंडुलकर संघाविरुद्ध खेळताना पहिल्या डावात २२३ धावा केल्या असून तेंडुलकर संघाने पहिल्या दिवसाअखेर २ बाद ८५ धावांची मजल मारली आहे .https://sindhudurgsamachar.in/kokan-जेएसडब्ल्यू-पेंट्सने-व/

ओव्हल मैदान येथील लढतीत वेंगसरकर संघाने गावस्कर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि याचा लाभ उठविताना धैर्य पाटील या सलामीवीराने शतकी मजल मारली. १६३ चेंडूंचा सामना करताना त्याने १६ चौकार आणि एका षट्काराच्या साहायाने १०७ धावा केल्या. या दरम्यान त्याने अगस्त्य काशीकर (६१) यांच्यासह दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागी रचली. देवाशिष घोडके (४६) आणि शेन रजा (२५) यांनी देखील संघाच्या धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. मात्र ६ बाद  २७७ धावांवरून त्यांचे शेवटचे ४ फलंदाज भोपळा फोडू शकले नाहीत आणि त्याच धावसंख्येवर त्यांचा डाव आटोपला. लक्ष्मणप्रसाद  विश्वकर्मा याने एकाच षटकात तीन फलंदाजांना बाद करताना ४२ धावांत ४ बळी मिळविले, तर उत्कर्ष सिंग (५९ धावांत ३ बळी) आणि दर्शन राठोड (३१ धावांत २ बळी) यानीही त्याला मोलाची साथ दिली. वेंगसरकर संघाने पहिल्या दिवसाखेर बिनबाद ११ धावा केल्या आहेत.

दरम्यान कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत रवी शास्त्री संघाने यश सिंग (३४), दर्श दोषी (६७), क्रिश पाटील (२८) आणि वेदांत कडू (२१) यांच्यामुळे पहिल्या डावात २३३ धावा केल्या. तेंडुलकर संघाच्या मोक्ष निकम याने ५2धावांत ४ बळी मिळविले तर तन्मय महंसारिया (४५/३) आणि श्रीगणेश धनावडे (३६/३) यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले. तेंडुलकर संघाने पहिल्या दिवसाअखेर २ बाद ८५ धावांची मजल मारली असून श्रेयस खिलारे (खेळत आहे २०) आणि हर्ष कदम (खेळत आहे ३५) ही जोडी मैदानात आहे.

संक्षिप्त धावफलक –  ओव्हल मैदान – गावस्कर संघ – ९४.२ षटकांत सर्वबाद २७७ (धैर्य पाटील १०७, अगस्त्य काशीकर ६१, देवाशिष घोडके ४६, शेन रजा २५; उत्कर्ष सिंग ५९ धावांत ३ बळी, लक्ष्मणप्रसाद  विश्वकर्मा  ४२ धावांत ४ बळी, दर्शन राठोड ३१ धावांत २ बळी). वि. वेंगसरकर संघ – १ षटकांत बिनबाद ११ .

 कर्नाटक सपोर्टींग –  शास्त्री संघ – ६७.५ षटकांत सर्वबाद २२३ (यश सिंग ३४, दर्श दोषी ६७, क्रिश पाटील २८, वेदांत कडू २१; तन्मय महंसारिया ४५ धावांत ३ बळी, श्रीगणेश धनावडे ३६ धावांत ३ बळी, मोक्ष निकम ५२ धावांत ४ बळी) वि. तेंडुलकर संघ – २४ षटकांत २ बाद ८५ (श्रेयस खिलारे खेळत आहे २०, हर्ष कदम खेळत आहे ३५).

                                                                **************

विजय बने – ९८१९०५९६७७.

फोटो ओळी –  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच लढतीत वेंगसरकर संघाविरुद्ध १०७ धावांची  शतकी खेळी करणारा धैर्य पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here