Maharashtra: ड्रीम ११ कप १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा ;युग असोपाची शतकी खेळी

0
96
ड्रीम ११ कप १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा :
ड्रीम ११ कप १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा :

युग असोपाची शतकी खेळीतेंडुलकर संघ  बाद ३६०

मुंबई, २२ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत आज युग असोपाच्या (१३७) शतकी खेळीमुळे सचिन तेंडुलकर संघाने गावस्कर संघाविरुद्ध पहिल्या दिवसाअखेर ७ बाद ३६० धावांचा डोंगर उभारला.  ओव्हल येथील दुसऱ्या लढतीत रवी शास्त्री संघाने वेंगसरकर संघाविरुद्ध खेळताना ६ बाद २६५ धावांची मजल मारली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिवराज्याभिषेक-२०२३-मो/

युग असोपाची शतकी खेळी; तेंडुलकर संघ ७ बाद ३६०

दरम्यान कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत सचिन तेंडुलकर संघाला प्रथम फलंदाजी करताना युवराज भिंगार्डे  (९२)  आणि आकाश मांगडे (७८)  यांनी १०७ धावांची सलामी दिली.त्यानंतर  भिंगार्डे आणि युग असोपा ही जोडी जमली आणि या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागी रचून प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा कस पहिला. युवराज भिंगार्डेला शतकाने मात्र हुलकावणी दिली. ९२ धावांवर असताना नील देवळेकरने त्याला पायचीत पकडले. त्याने १६४ चेंडूत १२ चौकार मारले.  युवराज बाद झाल्यानंतर युग   असोपाने मात्र आपले शतक पूर्ण केले आणि वीर शिंदेच्या गोलंदाजीवर तो यष्टिचित झाला. त्याने १६० चेंडूत १९ चौकारांसह आपली शतकी खेळी सजवली. हर्ष नाडकर याने देखील ३४ धावांची खेळी करीत आपल्या संघाच्या धावसंख्येत  खारीचा वाटा उचलला. वीर शिंदे याने ५४ धावांत ३ बळी मिळवत गोलंदाजीत चमक दाखविली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हां तेंडुलकर संघाने ७ बाद ३६० धावा केल्या होत्या.

ओव्हल येथील लढतीत दिलीप वेंगसरकर संघाने रवी शास्त्री संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. समृद्ध भट (३०) आणि विधिराज शुक्ला (६१) यांनी ६६ धावांची सलामी दिल्यानंतर निर्भय केणी (३१), आरव मल्होत्रा (१४), उज्जन भट्टाचार्य (२०) यांनी उपयुक्त धावा केल्या,  नीरज धुमाळ (खेळात आहे ६५) आणि शॉन कोरगावकर (खेळात आहे २५) या जोडीने मात्र सातव्या विकेटसाठी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचून संघाला ६ बाद २६५ धावांचा टप्पा गाठून दिला. वेंगसरकर संघाच्या अभिषेक पांडे (५५/२) आणि युवान शर्मा (५०/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक – सचिन तेंडुलकर संघ – ८०.५ षटकांत ७ बाद ३६० (युवराज भिंगार्डे ९२, आकाश मांगडे ७८, युग असोपा १३७, हर्ष नाडकर ३४; वीर शिंदे ५४ धावांत ३ बळी)वि. सुनील गावस्कर संघ.

रवी शास्त्री संघ – ८७ षटकांत ६ बाद २६५ (समृद्ध भट ३०, विधिराज शुक्ला ६१, निर्भय केणी ३१, आरव मल्होत्रा १४, उज्जन भट्टाचार्य २०, नीरज धुमाळ – खेळात आहे ६५, शॉन कोरगावकर खेळात आहे २५; अभिषेक पांडे ५५ धावांत २ बळी, युवान शर्मा ५० धावांत २ बळी) वि. दिलीप वेंगसरकर संघ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here