Maharashtra: ड्रीम ११ संघाला जेतेपद !

0
19
ड्रीम ११ संघ,
ड्रीम ११ संघाला जेतेपद

फोटो ओळीड्रीम ११ कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू आणि एम.सी.ए.च्या ज्युनिअर क्रिकेट निवडसमितीचे सदस्य रवी गडियार आणि आर.सी.एफ. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कुमार गाठे आणि अकादमीचे प्रशिक्षक अमित जाधव दिसत आहेत.

मुंबई, २७ डिसेंबर :  ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी, चर्चगेट संघाने दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने माहुल येथे आयोजित केलेल्या ड्रीम ११ कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे  विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी एम.सी.सी(मुंबई क्रिकेट क्लब), सांताक्रूझ संघावर ५ विकेट्स आणि १७ षटके राखून दणदणीत विजय मिळविला.  ५३  धावांची खेळी करणारा आराध्य  कळंबे हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. https://sindhudurgsamachar.in/kokan-रेशनचे-धान्य-१-ते-४-तारीख/

यावेळी बोलताना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी “मोठ्या खेळी करण्याची सवय लावून घेणे ही खरेतर यशाची गुरुकिल्ली असल्याचे या छोट्या खेळाडूंना सांगितले. उपविजेता ठरलेल्या मुंबई क्रिकेट क्लब हा  संघ  ४० षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३१.१ षटकांत १७२ धावांत गारद झाला. आपल्या वाट्याची ४० षटके न खेळता त्यांनी तब्बल ९ षटके वाया घालवली याच गोष्टीकडे त्यांनी मुलांचे लक्ष्य वेधले. या नऊ षटकांच्या खेळात तुम्ही किमान ४०-४५ धावा केल्या असत्या तरी त्या निर्णायक ठरू शकल्या असत्या असे त्यांनी सांगितले. शिवाय नियमित क्रिकेटचे फटके खेळा,  हल्ली टी.वी.वर दिसणाऱ्या टी-२०  सामन्यातील मारलेले कसेही फटके मारण्याचा प्रयत्न करू नका असाही सल्ला त्यांनी मुलांना दिला. दीर्घ खेळी आणि त्यासाठी उच्च दर्जाचे टेम्परामेंट या गोष्टी तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने मोलाच्या ठरतील असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई क्रिकेट क्लब संघाने ३१.१ षटकांत सर्वबाद १७२ धावा केल्या. यात कर्णधार समर्थ (५४) याचा मोलाचा वाटा होता. ऑफ स्पिनर डॅनियल याने २७ धावांत २ तर निखिल अहिरवाल याने २ धावांत २ बळी मिळविले.  या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने आराध्य कळंबे (५३) आणि अथर्व पाचकुडे (नाबाद ६१) यांच्या दमदार फलंदाजीमुळे ५ विकेट राखून या लक्ष्याचा लीलया पाठलाग केला. एम.सी.सी.च्या जय पाटील याने ४२ धावांत २ विकेट्स मिळविल्या. आराध्य कळंबे याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू  आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून ड्रीम ११ संघाच्या विहान अस्वले (१७७ धावा आणि १ बळी) याला गौरविण्यात आले.  सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ड्रीम ११ च्या डॅनियल याची तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून शिवाजी पार्क जिमखान्याच्या सुरज शाह याची निवड करण्यात आली. विजेत्यांना वेंगसरकर तसेच माजी क्रिकेटपटू आणि एम.सी.ए.च्या ज्युनिअर क्रिकेट निवडसमितीचे सदस्य रवी गडियार आणि आर.सी.एफ. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कुमार गाठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संक्षिप्तधावफलक : एम.सी.सी. सांताक्रूझ – ३१.१ षटकांत सर्वबाद १७२ (समर्थ ५४; डॅनियल २७ धावांत २ बळी, निखिल अहिरवाल २ धावांत २ बळी)पराभूत वि. ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी,चर्चगेट – २३ षटकांत ५ बाद १७३ (आराध्य कळंबे ५३, अथर्व पाचकुडे नाबाद ६१; जय पाटील ४२ धावांत २ बळी).

                                                                 *********

विजय बने – ९८१९०५९६७७

फोटो ओळी – ड्रीम ११ कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू आणि एम.सी.ए.च्या ज्युनिअर क्रिकेट निवडसमितीचे सदस्य रवी गडियार आणि आर.सी.एफ. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कुमार गाठे आणि अकादमीचे प्रशिक्षक अमित जाधव दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here