Maharashtra: “…तर आम्ही शांत बसणार नाही”, नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

0
49
नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळांना इशारा
नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

जालना : जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण एल्गार सभा’ पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केलं होतं. याचे पडसाद राज्यभर उमटले असून छगन भुजबळांवर टीका होत आहे. आता भाजपा नेते, नरेंद्र पाटील यांनीही छगन भुजबळांना इशारा दिला आहे. “भुजबळ पहिल्यापासून मराठा द्वेषी आहेत. आम्ही जरांगे-पाटलांच्या पाठिशी उभे आहोत. जरांगे-पाटलांना डिवचलं, तर आम्ही शांत बसणार नाही,” असं नरेंद्र पाटलांनी म्हटलं आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल्याच्या-सुकन्य/

“भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली”

नरेंद्र पाटील म्हणाले, “छगन भुजबळांनी विविध पदांवर काम केलं आहे. मराठा समाजाच्या सहकार्यानं काम करत असल्यानं भुजबळांनी सांगितलं आहे. पण, ‘ओबीसी एल्गार सभे’तून भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली आहे. भुजबळ पहिल्यापासून मराठाद्वेषी आहेत.”

“जरांगे-पाटलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यास…”
तुम्ही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडा. आम्हाला त्याच्याशी देणं-घेणं नाही. जरांगे-पाटलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देणार,” असा इशारा नरेंद्र पाटलांनी भुजबळांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here