Maharashtra: बीपीसीएलला उत्पादनस्पर्धात्मकता आणि ऊर्जा संवर्धनासाठीचे दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त

0
44
NAMC,BPCL,
कोची रिफायनरीला या वर्षीच्या उत्पादन स्पर्धात्मकतेसाठीच्या एनएएमसी (NAMC) राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

एनएएमसी (NAMC)- उत्पादन स्पर्धात्मकतेबाबत वचनबद्धतेसाठी आणि पीसीआरए (PCRA) – ऊर्जा संवर्धनासाठी

बीपीसीएलच्या कोची रिफायनरी आणि ऊर्जा संवर्धनाचे प्रयत्न राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आणि सक्षम २०२३ (SAKSHAM२०२३) मोहिमेमध्ये सन्मानित

मुंबई कोची, २०२३: बीपीसीएलच्या कोची रिफायनरीला या वर्षीच्या उत्पादन स्पर्धात्मकतेसाठीच्या एनएएमसी (NAMC) राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आणि सक्षम २०२३ (SAKSHAM२०२३) मोहिमेच्या कार्यक्रमात पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (PCRA) तर्फे ऊर्जा संवर्धन व नेट झीरो भविष्य साध्य करण्यासाठी असलेल्या अतूट बांधिलकीसाठी सन्मानित करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-बंदरावरील-झुल/

BPCL PCRA Award
सक्षम २०२३ (SAKSHAM२०२३) कार्यक्रमात पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (PCRA) तर्फे ऊर्जा संवर्धन व नेट झीरो भविष्य साध्य करण्यासाठी असलेल्या अतूट बांधिलकीसाठी सन्मानित करण्यात आले.

कोची रिफायनरीची अपवादा‍त्मक कामगिरी, सुरक्षिततेबाबतची वचनबद्धता, प्रभावी नेतृत्व आणि अन्य काही मापदंडांसाठी आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था (IRIM) ने सन्मानित केले आहे. एनएएमसी (NAMC) हे भारतातील आघाडीच्या उत्पादन युनिट्सचे मूल्यमापन करणारे आणि हटके व अपारंपरिक दृष्टिकोन असणाऱ्या, परिस्थितीनुरूप खास बनविलेली धोरणे असणाऱ्या संस्थांना ओळखून त्यांना पुढेआणणारे एक अत्यंत प्रतिष्ठित व्यासपीठ आहे.

 बीपीसीएलच्या कोची रिफायनरीचे कार्यकारी संचालक श्री. अजित कुमार के. यांनी बीपीसीएलच्या वतीने एनएएमसी (NAMC) येथे हे सुवर्ण पदक स्वीकारले. हा पुरस्कार बीपीसीएलच्या उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे आणि कंपनीला उत्पादन उद्योगात अधिक उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरणा देईल.

सक्षम २०२३ (SAKSHAM २०२३) च्या कार्यक्रमामध्ये पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (PCRA) ने बीपीसीएलच्या ऊर्जा संवर्धन व नेट झीरो भविष्य साध्य करण्यासाठीच्या वचनबद्धतेला  सन्मानित केले. यावेळी रिफायनरीजचे संचालक श्री. संजय खन्ना यांनी केंद्रीय राज्य पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि श्रम व रोजगार मंत्री माननीय श्री. रामेश्वर तेली यांच्याकडून हे प्रशस्तीपत्रक स्वीकारले. कार्बन फूटप्रिंटचा आरोग्यावर व पर्यावरणावर होणाऱ्या वाढत्या प्रतिकूल परिणामांवर प्रकाश टाकणे आणि ग्राहकांना स्वच्छ आणि हरित इंधनाकडे वळण्यास प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान माननीय श्री. रामेश्वर तेली यांनी बीपीसीएलच्या भारत हायस्टार स्टोव्हचा आढावा घेतला. ज्याची थर्मल कार्यक्षमता बाजारात उपलब्ध असलेल्या सामान्य एलपीजी स्टोव्हपेक्षा ७४% जास्त आहे. महाराष्ट्राचे राज्यस्तरीय समन्वयक श्री. संतोष निवेंदकर यांचा ही मागील वर्षात सक्षम मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त उपक्रम राबविल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

सक्षम (SAKSHAM) हा तेल व वायू संवर्धनाची गरज आणि हे संवर्धन करण्यासाठी आवश्यक साधानांबाबत लोकांमध्ये जागरूकता आणण्याच्या एकमेव उद्देशाने, पीसीआरए आणि तेल उद्योग यांच्यासंयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आधिपत्याखाली आणि पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार (PCRA) आयोजित एक  महत्त्वपूर्ण वार्षिक कार्यक्रम असून बीपीसीएल उत्पादन स्पर्धात्मकता आणि ऊर्जा संवर्धनामध्ये उत्कृष्टतेसाठी कायम वचनबद्ध आहे आणि या क्षेत्रामध्ये अधिक ऊंची गाठण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here