MAharashtra: महाराष्ट्रात एकाच टप्यात होणार मतदान,आचार संहिता लागू

0
5
निवडणुक,
महाराष्ट्रात एकाच टप्यात होणार मतदान,आचार संहिता लागू

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रिय निवडणुक आयुक्त राजीवकुमार यांनी जम्मूकाश्मिर आणि हरियाणा राज्यातील मतदारांचे अभिनंदन करुन पत्रकार परिषदेला सुरुवात केली. महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा यावेळी करण्यात आली. गेल्या निवडणुकीत कमी झालेला हिंसाचार आणि मतदारांचा लाभलेला प्रतिसाद पहाता निवडणुक प्रक्रियेला मतदार स्विकारत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-बंद-पडलेल्या-भारती-शिपया/

९ कोटी ३ लाख महाराष्ट्रात मतदार असून ४ कोटी ३ लाख महिला मतदारांची संख्या आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या १२ लाख ५ हजार आहे. दिव्यांग मतदार ६ लाख २ हजार आहेत. नवमतदार १८ लाख ६७ हजार आहेत. एकूण मतदारसंघ २८८ आहेत त्यामध्ये एससी २९, एसटी २५ आहेत. महाराष्ट्रात एकूण १ लाख १८३ मतदानकेंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत. २९ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार आहे. ८५ पेक्षा जास्त वय असणार्‍या मतदारांना विशेष सुविधा असून त्यांचे मतदान घरुनच केले जाईल. काही ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र मतदानाची व्यवस्था केली जाईल. तेथे महिला कर्मचारी ठेवल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांना बूथवर बसण्याची सुविधा ठेवण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबरला सदर निवडणुकीचा निकाल आहे.

विधानसभा निवडणूक 2024

▪️ मतदान वेळापत्रक

▪️ विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे

▪️ आजपासून आचारसंहिता लागू

▪️ अधिसूचनेची तारीख: 22/10/2024

▪️ नामनिर्देशन फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख: 29/10/2024

▪️ छाननी: 30/10/2024

▪️ पैसे काढणे: 4/11/2024

▪️ मतदान तारीख: 20/11/2024

▪️ मतमोजणी: 23/11/2024

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here