Maharashtra: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; संपूर्ण राज्याचा निकाल अवघा पावणे चार टक्के

2
31
महाराष्ट्र-शिक्षक-पात्रता-परीक्षेचा-निकाल-जाहीर

मुबंई- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच Maha TET exam 2021 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर कारणात आला आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्यभरातून या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. तरीही राज्याचा निकाल अवघे 3.70% इतका लागला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 21 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. त्यापैकी पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा याचा निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. मात्र या दोन्ही पेपरमध्ये लाखो उमेदवारांपैकी काहीच उमेदवार पास होऊ शकले आहेत.