Maharashtra: मुंबई बोट अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश; एकूण १३ जणांचा मृत्यू

0
14
accident nr gate way of India,
मुंबई बोट अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश; एकूण १३ जणांचा मृत्यू

⭐मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई l 19 डिसेंबर

मुंबईत बुधवारी नीलकमल नावाची बोट गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला आहे. दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता ८० असताना त्यातून ११० जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान या प्रकरणी १३ जणांचा मृत्यू आहे. त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-पत्नीस-मुलबाळ-होत-नसल्या/

दरम्यान, या बोट अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक येथील अहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात आई, वडील आणि पाच वर्षांचा मुलाचा निद्धेश अहिरे याचा समावेश आहे. हे सर्व जण नाशिकवरून पर्यटनासाठी आले होते. बोटीवर तब्बल ११० जण होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) अधिकृतपणे देण्यात आली आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बोटीत असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, नीलकमल बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय नौदलाकडून व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात तपास करून अधिकृत माहिती नौदलाकडून देण्यात येणार आहे.

नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होती. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर कोणी मिसिंग असेल तर उद्या सकाळपर्यंत (गुरूवार) कळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण
जेएनपीटी हॉस्पिटल – ५६
नेव्ही डॉकयार्ड हॉस्पिटल – ३२
अश्विनी हॉस्पिटल – १
सेंट जॉर्ज हॉस्पिटल – ९
करंजे हॉस्पिटल- १२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here