Maharashtra: राज्य सरकारची एसटी महामंडळाला ३०० कोटी रुपयांची तातडीची मदत

0
42
एसटीच्या ताफ्यात दिवाळीच्या मुहूर्तावर 110 खासगी बसेस, मुंबई ते रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर धावणार

मुंबई – राज्य सरकारने एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते. पण राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारनं द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागले असा इशारा बरगे यांनी दिला आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-पोस्ट-ऑफिस-वेंगुर्ला-नज/

दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३६० कोटी रुपये लागतात. परंतु तीन महिन्यामध्ये शिंदे सरकारकडून फक्त ६०० कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून ७३८ कोटी रुपयांची मागणी केली होती. आता फक्त ३०० कोटी रुपयेच देण्यात आले आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtr-सर्व-ठाकरेंनी-एकत्र-येण/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here