🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l शिर्डी
साई समाधी मंदिरातील साईंच्या संगमरवरी मूर्तीची भविष्यात हुबेहूब प्रतिकृती तयार करता यावी, तसेच तब्बल 70 वर्षांपूर्वी इटालियन मार्बलमध्ये घडवण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यस्थिती काय आहे, याचा अंदाज यावा, यासाठी साई मूर्तीचं 3D स्कॅनिंग केलं जाणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-ह्वी-एन-नाबर-मेमोर/
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे. ही समिती 20 डिसेंबरला साई मंदिरास भेट देऊन हे थ्रीडी स्कॅनिंग करणार आहे. त्यामुळे 20 डिसेंबरला दुपारी पावणेदोन ते साडेचार या कालावधीत साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.