Maharashtra: शिवराज्याभिषेक २०२३ मोठ्या दिमाखात साजरा करणार. युवराज छत्रपती संभाजीराजे.

0
143
शिवराज्याभिषेक २०२३
शिवराज्याभिषेक २०२३ मोठ्या दिमाखात साजरा करणार - युवराज छत्रपती संभाजीराजे.

शिवभक्तांच्या उपस्थितीत घेतली बैठक..

पुणे यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वे वर्ष सुरू होत आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील दि.६ जून हा एक महत्त्वाचा दिवस होता. हा दिवस सर्वच शिवभक्तांसाठी तितकाच महत्त्वाचा असल्याने, तसेच हा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन असल्याने मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल. यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-रहस्याचा-शोध-घेण/

६ जून २०२३ ते ६ जून २०२४ असे शिवराज्याभिषेकाचे वर्ष विविध लोकोपयोगी व ऐतिहासिक उपक्रमांनी साजरे केले जाईल. यासाठीच्या व्यापक नियोजनासाठी पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व शिवभक यांच्या उदंड उत्साहात ही बैठक संपन्न झाली. यावेळी युवराज संभाजी छत्रपती महाराज बोलत होते. बैठकीला महाराष्ट्रातील  शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.युवराज संभाजी छत्रपती महाराज म्हणाले, ३५० वा शिवराज्याभिषेक दिन हा जगभर पोहोचेल आणि विश्ववंदनीय होईल यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. रायगड किल्ल्यास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे. यावेळी त्यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून आत्तापर्यंत केलेल्या कामांचा आढावाही घेतला. बैठकीत पाणी, विद्युत पुरवठा, आपत्ति व्यवस्थापन, पार्किंग व शटल बस व्यवस्था, रोपवे, स्वच्छता, निवास व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन याची सविस्तर माहिती दिली.

शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या प्रमुख मार्गदर्शिका आदरणीय युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी यावेळी सर्व महोत्सव व्यवस्थापन कमिटीच्या प्रमुखांकडून कामाचा आढावा घेतला. शिवभक्तांना शिवराज्याभिषेक महोत्सवात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती  याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत होते
 
३५० सुवर्ण होणांचा होणार अभिषेक.
चंदुकाका सराफ यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन खास सोन्याचे ३५० सुवर्ण होण तयार केले असुन त्यांचा अभिषेक शिवमुर्तीवर करणेत येणार आहे. याबद्दल चंदुकाका सराफ पेढीचे आभार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी मानले.सर्वांचे स्वागत समिती सदस्य अतुल चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले. आभार कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी मानले.

सदरच्या बैठकीस कोल्हापूरहून विनायक फाळके, संजय पवार, उदय घोरपडे, अमर पाटील- सचिव, राहुल शिंदे, विश्वास निंबाळकर, करण गायकर (नाशिक), विनोद साबळे(रायगड) , धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे-पाटील(पुणे),  देहू संस्थांनचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे महाराज, माणिक मोरे महाराज, रमेश पाळेकर (लोणावळा),  हनुमंत काकडे(उस्मानाबाद),  प्रशांत दरेकर(रायगड), आप्पासाहेब कुडेकर (संभाजीनगर),  सत्यजित भोसले (मुंबई), प्रशांत शिवणकर , बा रायगड परिवाराच्या चैत्राली कारेकर, सतीश वेताळ पाटील (संभाजीनगर), गंगाधर काळकुटे (बीड),  डॉ.गजानन  देशमुख (अमरावती),  वर्षा चास्कर, सत्यम सूर्यवंशी (करमाळा),  राहुल पवार (करमाळा) आदी सदस्य व  शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here