Maharashtra: श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत श्री नारायणन वाघुल लिखित  ‘रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे प्रकाशन

0
42
(L to R) K.V. Kamath, Chairman, National Bank for Financing Infrastructure and Development; Mr. Ajay Piramal, Chairman Piramal Group; Smt. Nirmala Sitharaman, Hon'ble Union Minister of Finance and Corporate Affairs; Mr. Narayanan Vaghul and Ms. Kalpana Morparia, Former Chairperson, J.P. Morgan South and South East Asia at the book launch of ‘Reflections’
श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत श्री नारायणन वाघुल लिखित 'रिफ्लेक्शन्स' पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, २८ एप्रिल २०२३: माननीय केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत प्रसिद्ध बँकर श्री. नारायणन वाघुल यांनी लिहिलेल्या ‘रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात श्री. वाघुल यांच्या भारताच्या आर्थिक परिदृश्यातील अनेक दशकांच्या अनुभवांची ठळक विस्तृत माहिती आहे. या कार्यक्रमाला नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष श्री. के. व्ही. कामथ, जे. पी. मॉर्गन साऊथ अँड साऊथ ईस्ट एशियाचे माजी अध्यक्ष श्रीमती कल्पना मोरपारिया तसेच  प्रख्यात बँकर्स आणि आघाडीच्या वित्तीय संस्थांचे सदस्यही उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राजसिंग-डुंगरपूर-चषक-क/

भारतातील आधुनिक बँकिंगचे शिल्पकार म्हणून व्यापकपणे मानले जाणारे श्री. वाघुल यांचे पुस्तक त्यांच्या संपूर्ण सुविख्यात कारकिर्दीतील नाट्यमय, हलक्याफुलक्या आणि महत्त्वपूर्ण घटनांचे वर्णन करते. आकर्षक किस्यांनी भरलेल्या या पुस्तकात विविध उपक्रमांची माहिती आहे. या उपक्रमांचा एक भाग बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता.

श्री वाघुल यांनी प्रस्थापित केलेल्या प्रक्रिया पद्धती भारतीय आर्थिक परिसंस्थेत मजबूत आणि शाश्वत होत गेल्या. बँकिंग टॅलेंटमधील असंख्य कौशल्यवान लोकांना मार्गदर्शन करण्यात आणि बँकिंगमध्ये अधिक महिला सीईओना सक्रियपणे घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याद्वारे स्त्री-पुरुष समानतेच्या गुणवत्तेची संस्कृती वाढायला मदत झाली आहे.

माननीय केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी श्री नारायणन वाघुल यांचा बँकिंगमधील व्यापक अनुभव आणि त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली. शाश्वत प्रभाव पाडणाऱ्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यातील त्यांचे योगदान देखील त्यांनी वाखाणले. त्यांनी  श्री. वाघुल यांच्या महिला सक्षमीकरणावरील कल्पना आणि दूरदृष्टी यांवर प्रकाश टाकला.  आर्थिक सेवांमध्ये अधिकाधिक महिला नेतृत्वाची भूमिका घेत असताना हे भारतासाठी सुसंगत  आणि मौल्यवान राहील.

यावेळी बोलताना पिरामल ग्रुपचे अध्यक्ष श्री. अजय पिरामल म्हणाले, “श्री. नारायणन वाघुल यांनी लिहिलेल्या आठवणींचा हा खजिना सादर करताना मला खूप आनंद होत आहे. त्यांच्याविषयी मला पराकोटीचा आदर आहे आणि मार्गदर्शनासाठी आणि प्रेरणा मिळावी म्हणून मी अनेकदा त्यांच्याकडे जातो. श्री. वाघुल यांना भारतातील बँकिंगचे ‘भीष्म पितामह’ मानले जाते आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास निःस्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी, मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण यांसाठीचा आदर्श आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या या जीवन प्रवासातील  गोष्टी तरुण पिढ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. मूल्य प्रणालींच्या अंगभूत सामर्थ्यांवरील त्यांचा दृढ विश्वास त्यांच्या विविध व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रयत्नांतून खऱ्या अर्थाने परावर्तित होतो. माहिती आणि किस्यांनी परिपूर्ण असलेले ‘रिफ्लेक्शन्स’ आपल्याला वैयक्तिक आणि एकत्रितपणे भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला तयार करण्याकरता विचारांचे खाद्य देते.”

‘रिफ्लेक्शन्स’ चे लेखक श्री. नारायणन वाघुल म्हणाले, “या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल मी श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मनापासून आभार मानतो. ज्यांच्याविषयी आत्यंतिक आदर आणि स्नेह आहे अशा श्री. अजय पिरामल यांचेही मी आभार मानू इच्छितो. त्यांच्या सातत्यपूर्ण चिकाटी आणि प्रोत्साहनामुळेच मला माझ्या सात दशकांहून अधिक काळातील आठवणी लिहिण्यास चालना मिळाली.

अनेक अविस्मरणीय घटनांच्या मालिकेने माझी कारकीर्द भरलेली होती आणि माझ्या दृष्टिकोनाचा आधार म्हणून माझ्या स्वतःच्या अनुभवांचे संकलन असलेले हे पुस्तक सादर  करताना मला आनंद होत आहे.  भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आपण केवळ वेळोवेळी तीव्र अडथळ्यांचा सामना केला असे नाही तर अशा संकटांवर मात करण्यासाठी आणि आपल्या परंपरांशी मजबूत दुवा कायम ठेवत आपले स्थैर्य राखण्यात उल्लेखनीय लवचिकता दाखवली आहे. आज, प्रमुख नेत्यांनी एकत्र येणे आणि येणाऱ्या आगामी वर्षांमध्ये समाजाचा पाया बनणाऱ्या तरुण पिढीला मूल्य प्रणाली देणे अधिक आवश्यक आहे. माझ्या मते, शैक्षणिक अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाचे पुनरुज्जीवन, भारतीय अर्थव्यवस्थेला तिची पूर्ण विकास क्षमता साध्य करण्यात मदत करण्यासाठी चालना देणारे ठरेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here