जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा १५ वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये सरकारने सुधारणा न केल्याने मनोज जरांगे यांनी पाणी आणि सलाईन बंद केले होते. मनोज जरांगे यांनी रविवारी सकाळपासून पाणी आणि सलाईनचा त्याग केला होता. यामुळे मनोज मनोज जरांगे पाटील यांना थकवा आणि अशक्तपणा आला होता. तरीही मनोज जरांगे हे वैद्यकीय तपासणी करुन घ्यायला आणि सलाईन लावून घेण्यास विरोध करत होते. मात्र, त्यांची ढासळत चाललेली प्रकृती पाहून अंतरवाली सराटी येथील गावकऱ्यांनी जरांगे यांच्याकडे सलाईन लावण्याचा आग्रह धरला. हा आग्रह मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावून घेतले. डॉक्टरांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेबारा वाजता तपासणी करुन, जरांगे पाटील यांना सलाईन लावले. https://sindhudurgsamachar.in/kokan-सद्गुरु-प्रासादीक-भजन-मं/
मंगळवारी सकाळी १० वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुपारी दोन वाजता ते सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. यावेळी ते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. माझं गाव भावनिक झालं आहे. गावातील महिला रडत आहेत, ते जरा काळजाला लागतंय. माझ्यात निर्णय घ्यायची क्षमता राहिलेली नाही. सरकारला वेळ का पाहिजे हे कळले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार आहे. पण मराठा समाजाला खरंच आरक्षण देणार का, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
ढासळत्या प्रकृतीवर आरक्षण हाच उपाय: जरांगे पाटील मराठा समाजाने ७५ वर्षे अन्याय सहन केला आहे, आता माघार नाही, आरक्षण मिळत नाही हेच दुखणे आणि आरक्षण हाच आपल्या प्रकृतीवर उपाय असल्याचे मनोज पाटील जरांगे यांनी सोमवारी रात्री सांगितले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात सरकारकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.