दैनिक सिंधुदुर्ग समाचार l व़त्तसेवा-
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एकूण 13 हजार 735 पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5870 पदे आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांसाठी 3001 पदे रिक्त आहेत. SC उमेदवारांसाठी 2118 पदांसाठी नोकऱ्या आहेत. एसटी प्रवर्गातील 1385 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 1361 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokanसिंधुकन्या-कु-क्रांती-नि/
SBI ही राष्ट्रीय बॅंक असून त्याच्या भारतातील विविध राज्यांमध्ये शाखा आहेत. असे असले तरी उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतो. त्यातही एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज कराल त्या राज्याची स्थानिक भाषा वाचायला, लिहायला आणि बोलता येणे आवश्यक आहे. 7 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
SBI भरती सर्व उमेदवारांना प्रथम ऑनलाइन प्राथमिक परीक्षेत बसावे लागेल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकता.